गर्भलिंग निदान करण्यासाठी विवाहितेचा छळ
By Admin | Published: August 10, 2015 12:37 AM2015-08-10T00:37:35+5:302015-08-10T00:58:38+5:30
बीड : गर्भलिंग निदान करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, असे असतानाही मुलगाच हवा असा अट्टहास कायम असल्याचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे
बीड : गर्भलिंग निदान करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, असे असतानाही मुलगाच हवा असा अट्टहास कायम असल्याचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे. माजलगाव येथील शासकीय नोकरदार महिलेचा सासरच्यांनीच गर्भलिंग निदान करण्यासाठी तिचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी माजलगाव ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात झाला आहे.
परभणी जिल्ह्यातील वनिता (नाव बदलले आहे) या कृषी सहायक कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांचा माजलगाव येथील रविकिरण विश्वनाथ वाघमारे यांच्याशी विवाह झाला होता. लग्नाच्या काही महिन्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींनी तिचा छळ करण्यास सुरूवात केली होती.
दिराला नौकरीला लावण्यासाठी माहेराहून पैसे घेऊन यासाठी तिचा छळ सुरू होता. त्यातच वनिता गरोदर राहिल्या. तिच्या पोटात मुलगी आहे का मुलगा ? मुलगी असेल तर आम्हाला नको आहे, असे तिला वारंवार सांगण्यात येत होते. वनिता सोनोग्राफी करण्यास तयार नव्हती त्यामुळे तिच्या छळात दिवसेंदिवस वाढ होत गेली.
वनिता सासरच्या मंडळींना वारंवार विरोध करीत असल्यामुळे सासरच्यांनी तिचा छळ करून शेवटी घरातून हाकलून दिले. त्यामुळे वनिताने माजलगाव शहर ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून रविकिरण विश्वनाथ वाघमारे (नवरा), विश्वनाथ विठ्ठल वाघमारे (सासरा), दैवशाला विश्वनाथ वाघमारे (सासू), प्रज्ञा विश्वनाथ वाघमारे (नणंद), अमोल विश्वनाथ वाघमारे (दीर) यांच्याविरूद्ध कलम ४९८, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
माजलगाव येथे घडलेल्या घटनेवरून मुलगा पाहिजे असल्याची मानसिकता स्पष्ट होते. शासनाने मुलगी वाचविण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू केलेले आहेत ते आजही कायम आहेत.
४मात्र, जोपर्यंत लोकांची मानसिकता बदलली जात नाही तोपर्यंत हा बदल होणे शक्य नाही.
४मानसिकता बदलली तरच पुढील काळात मुलींच्या जन्मदरात वाढ होऊ शकते. गर्भलिंग निदान करण्यासाठी छळ केला जात असल्याचे हे प्रकरण दाखल करण्याचे धाडस वनिताने दाखविले. अशी अनेक प्रकरणे तक्रारीद्वारे महिलांनी समोर आणणे काळाची गरज आहे.