सोन्यासाठी विवाहितेचा विष पाजून केला खून

By Admin | Published: October 19, 2014 12:08 AM2014-10-19T00:08:48+5:302014-10-19T00:21:14+5:30

उमरगा : घरघुसणीसाठी सोने का दिले नाही, या कारणाचा राग मनात धरून एका विवाहितेस विष पाजून खून केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरूध्द उमरगा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Married to death for gold | सोन्यासाठी विवाहितेचा विष पाजून केला खून

सोन्यासाठी विवाहितेचा विष पाजून केला खून

googlenewsNext


उमरगा : घरघुसणीसाठी सोने का दिले नाही, या कारणाचा राग मनात धरून एका विवाहितेस विष पाजून खून केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरूध्द उमरगा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना उमरगा शहरातील शिवपुरी भागात शुक्रवार ते शनिवार या दोन दिवसांच्या कालावधीत घडली़
पोलिसांनी सांगितले की, उमरगा शहरातील शिवपुरी भागात प्रशांत विराप्पा बडोरे व त्यांची पत्नी सविता प्रशांत बडुरे वास्तव्यास होते़ गेल्या तीन वर्षापूर्वी प्रशांत व सविता यांचे लग्न होवून त्यांना एक मुलगा झाला आहे़ ‘तुझ्या आई-वडिलांनी घरघुसणीसठी एक तोळ्याची अंगठी का घातली नाही’ म्हणून मनात राग धरून पती, सासू, सासरा, नणंद यांनी मानसिक, शारीरिक जाच करीत १७ आॅगस्ट रोजी विष पाल्याचे शिवबसप्पा पाटील (रा़देवगाव ता़आळंद जिग़ुलबर्गा) यांनी दिलेल्या फिर्यादत म्हटले आहे़ या फिर्यादीवरून पती प्रशांत विराप्पा बडोरे, सासरा विराप्पा कल्याणप्पा बडोरे, सासू कलावती विरप्पा बडुरे, नणंद ज्योती रमेश कलबुर्गे या चौघाविरूध्द उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपोनि विलास गोबाडे हे करीत आहेत़ दरम्यान, सविता बडुरे यांना शनिवारी सासरच्या मंडळींनी उमरगा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते़ डॉक्टरांनी तपासणीअंती तीस मयत घोषित केले होते़ याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ़ सी़डीक़स्तुरे यांनी दिलेल्या माहितीवरून प्रारंभी उमरगा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़ त्यानंतर शिवबसप्पा पाटील यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)

Web Title: Married to death for gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.