मंठा येथे विवाहितेचा खून, पती फरार
By Admin | Published: August 26, 2016 12:21 AM2016-08-26T00:21:04+5:302016-08-26T00:40:29+5:30
जालना / मंठा : न्यायालयात दाखल केलेला दावा मागे का घेतला नाही या कारणावरून आरोपी बबन बापूराव आघाव रा. अंभोरा शेळके याने पत्नी कमल आघाव हिच्या डोक्यात
जालना / मंठा : न्यायालयात दाखल केलेला दावा मागे का घेतला नाही या कारणावरून आरोपी बबन बापूराव आघाव रा. अंभोरा शेळके याने पत्नी कमल आघाव हिच्या डोक्यात धारदार वस्तुने वार करून तिचा खून केल्याची घटना २० आॅगस्ट रोजी अंभोरा शिवारात घडली. सरस्वती जानूजी यिप्पर (६०) रा. वडव ता. लोणार जि. बुलडाणा यांच्या फिर्यादीवरून गुरूवारी मंठा पोलिस ठाण्यात कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
घरगुती कारण आणि जमिनीच्या वादातून पती बबन याच्याविरुद्ध कमल हिने कोर्टात केस दाखल केली होती. याबाबत वारंवार तक्रार मागे घेण्याचा तगादा लावूनही कमल केस मागे घेत नसल्याचा राग बबन याचा मनात होता. दररोजच्या कुरबुरीमुळे कमल ही आई वडीलाकडे वडव ता. लोणार येथे राहत होती. १९ आॅगस्ट रोजी बबन याने कमल हिला वडव येथून मोटरसायकले आणत असताना रस्त्यातच दोघांत कुरबूर झाली त्याच कुरबुरीतून आरोपी बबन याने कमल हिच्या डोक्यात धारदार वस्तूने वार करून ठार केले. याची कुठे वाच्यता होवू नये म्हणून आरोपीने तिचे प्रेत गट क्रमांक ७८ येथील विहिरीत टाकले. मुलीचा शोध लागत नसल्याने सरस्वतीबाई जानूजी यिप्पर यांनी गुरूवारी मंठा पोलिस ठाण्यात बबन आघाव याच्याविरुद्ध फिर्याद दिल्याने मंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप पती फरार आहे. (वार्ताहर)