सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 06:58 PM2019-03-16T18:58:17+5:302019-03-16T18:59:31+5:30
सासरच्या छळास कंटाळून शिवणगाव येथे गुरु वारी सुनंदा लक्ष्मण रणमाळे हिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची फिर्याद विवाहितेचा भाऊ ज्ञानेश्वर देवचंद अहेर (रा. रामवाडी, नाशिक) यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस स्थानकात दाखल केली आहे.
त्र्यंबकेश्वर : सासरच्या छळास कंटाळून शिवणगाव येथे गुरु वारी सुनंदा लक्ष्मण रणमाळे हिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची फिर्याद विवाहितेचा भाऊ ज्ञानेश्वर देवचंद अहेर (रा. रामवाडी, नाशिक) यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस स्थानकात दाखल केली आहे.
फिर्यादीवरून विवाहितेचा पती लक्ष्मण वाळू रणमाळे, सासू ठकूबाई वाळू रणमाळे, दीर मनोहर वाळू रणमाळे व पांडुरंग वाळू रणमाळे यांच्याविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दिलेल्या फिर्यादीत महिलेचा भाऊ ज्ञानेश्वर देवचंद अहेर याने म्हटले आहे की, सततचा शारीरिक व मानसिक छळ करून वैतागलेल्या बहिणीने घराजवळील विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली.
२३ वर्षांपूर्वी माझी बहीण सुनंदा हिचा विवाह शिवणगाव येथील लक्ष्मण वाळू रणमाळे बरोबर झाला. गेल्या २३ वर्षांत त्यांना तीन मुले नामे प्रकाश, नवल व चेतन यापैकी, प्रकाश हा मामा ज्ञानेश्वर यांच्याकडे नाशिक येथे राहतो. तर नवल व चेतन हे आईकडे म्हणजे सुनंदाकडे राहत असत. या फिर्यादीत पुढे असे म्हटले आहे की, सुनंदाकडे पती लक्ष्मण, सासू ठकूबाई, जेठ मनोहर व दीर पांडुरंग हे वारंवार पैशाची मागणी करीत असत. कर्ज द्यावयाचे आहे, खर्चाला पैसे मागणे यासाठी सासू ठकूबाईचा वारंवार तगादा असे. पैसे नाही आणले की, सासू आपल्या मुलाला एकाचे दोन करून मुलाला सांगत असे. त्यावरून पती लक्ष्मण हा सुनंदास नेहमीच मारहाण तसेच मानसिक, शारीरिक छळ करीत असे.
याबाबतचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक लोखंडे आदी करीत असून, अद्याप कोणासही ताब्यात घेण्यात आलेले नाही.