विवाहितेचा छळ; १६ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:48 AM2017-09-03T00:48:18+5:302017-09-03T00:48:18+5:30
: माहेराहून पैसे घेऊन येण्याच्या मागणीसाठी पत्नीला मारहाण करून छळ करणाºया पतीसह सासरच्या १६ जणांविरोधात वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. विवाहितेच्या पतीने दुसरा विवाह केल्याचेही सदर महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : माहेराहून पैसे घेऊन येण्याच्या मागणीसाठी पत्नीला मारहाण करून छळ करणाºया पतीसह सासरच्या १६ जणांविरोधात वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. विवाहितेच्या पतीने दुसरा विवाह केल्याचेही सदर महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.
वसमत येथील याकूब कॉलनी भागातील रहिवाशी महिला नाजमीन शेख रफीक (३५) या महिलेने वसमत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिसांनी पती शेख रफीक शेख युनूस (रा.वसमत)सह सासू, दीर, नणंद, आदींसह १६ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. महिलेच्या संमतीशिवाय पतीने दुसरा विवाह करून पहिल्या पत्नीला त्रास दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
५ संगणकांची चोरी
कळमनुरी : इंदिरानगर येथील जिल्हा परिषद उर्ध्वपैनगंगानगर शाळेत १ सप्टेंबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शाळेचे कुलूप तोडून पाच काँप्युटर लंपास केल्याची घटना घडली.
१ सप्टेंबरच्या मध्यरात्री शाळेतील बाहेरच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कार्यालयाचे कुलूप तोडून ठेवलेले पाच संगणक लंपास केले. त्यांची किंमत एक लाख रुपये असल्याचे सांगण्यात येते. या संगणकात शाळेत सर्व डाटा असल्याने शाळेची चांगलीच अडचण झाली आहे. ठसे तज्ज्ञ, रासायनिक तज्ज्ञ, श्वान पथकालाही पाचारण केले होते. ठसे टी.के. पाईकराव यांनी घेतले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
महा ई सेवा केंद्र येथे चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरा : येथील बसस्टॅडजवळ शेषराव मारोती इंगळे यांचे महा ई सेवा केंद्र असून ३१ आॅगस्ट रोजी त्यांच्या दुकानामधून दोन मोबाईल विक्रीला ठेवले होते ते चोरीस गेले व त्यांच्यासोबत कॅमेरा व आधार मशीनची जीपीएस कीट, रिचार्ज व्हाऊचर व नगदी चार हजार रुपये असा एकूण ४७ हजार ९११ रुपयांचे साहित्य कोणीतरी चोरट्याने पळविले. दुकानावरील टीनपत्रे काढून आत प्रवेश करून ही चोरी केली आहे. पोलीस उपनिरीक्षक वंदना वीरनत तसेच बीट जमादार इंगोले पाटील यांनी दुकानाचा पंचनामा करून पुढील तपास करत आहेत.