ग्रामीण भागातही लग्नसराईची धूम!

By Admin | Published: May 13, 2017 12:33 AM2017-05-13T00:33:49+5:302017-05-13T00:34:24+5:30

कुंभार पिंपळगाव : सध्या लग्नसराईचा शेवटचा महिना असल्याने घनसावंगी तालुक्यात व परिसरात लग्न सोहळ्याला जाण्यासाठी बसस्थानकामध्ये गर्दी होत आहे.

Married woman in rural areas! | ग्रामीण भागातही लग्नसराईची धूम!

ग्रामीण भागातही लग्नसराईची धूम!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : सध्या लग्नसराईचा शेवटचा महिना असल्याने घनसावंगी तालुक्यात व परिसरात लग्न सोहळ्याला जाण्यासाठी बसस्थानकामध्ये गर्दी होत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. सध्या कडक उन्हाळा सुरु असून, एप्रिल महिन्याचे तापमान ४२ अंशांवर पोहचले होते.
उन्हाळ्याचा शेवटचा महिना आहे. लग्नसरईच्या शेवटच्या तिथी आहेत. एकाच तिथीला अनेक लग्न लागताना दिसून येत आहेत. एकाच तिथीला अनेक लग्न असल्याने कापड दुकाने, गिफ्ट सेंटरवर ही गर्दी दिसून येत आहे. दुसरीकडे उन्हाचा परा दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या उन्हात वृद्ध, लहान मुले घामाघुम होऊन चांगलेच त्रस्त झाले आहेत. तर उन्हापासून बचाव करण्यासाठी थंड सावली व शीतपेय घेण्यासाठी नागरिक वळत आहेत.
एकंदरीत कडक उन्हात लग्नसरइची धुम असल्याने लग्न सोहळ्यासाठी मित्र, पाहुणे, नातलग, सहकारी, आप्तगण यांना कडाक्याच्या उन्हात ही चांगलीच धावपळ होताना दिसून येत आहे.
कुंभारपिंपळगाव परिसरातील लोक लग्न सोहळ्याला हजेरी लावण्यामोठी गर्दी करताना दिसत आहेत. मे महिन्यात उन्हाचा पारा चढाच आहे. दुसरीकडे लग्नसराई चा शेवटचा महिना असल्याने एकाच तिथीला अनेक लग्नाच्या तारखा निघत आहेत. त्याही दुपारच्या भर उन्हात लग्न सोहळ्यासाठी जाण्यास वऱ्हाडी मंडळीची चांगली घालमेल होताना दिसत आहे.
एकाच तारखेला अनेक लग्न असल्याने कुटुंबातील सर्वच जण नातेवाईक, भावकी, मित्र मंडळींच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावत आहेत. काही ठिकाणी गाठी भेटींवरच कार्यक्र म आयोजित करण्यात येत आहे. या कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी कोणी सावलीचा आधार घेत आहेत. कोणी ज्यूस, रसवंतीकडे गर्दी करीत आहेत. ग्रामीण भागात पाणीटंचाई असल्याने बाटलीबंद पाण्याची मागणी वाढली आहे.
तर दुसरीकडे पावसाळा जवळ आल्याने शेतकरी या कडक उन्हात शेती काम करण्यात व्यस्त आहेत. सध्या परिसरा ४१ ते ४३ अंशांवर पारा गेला आहे. पण कडक उन्हात लग्नसराई मोठी धुम असून, बाजारपेठेतूनही मोठी उलाढाल होत असल्याचे चित्र कुंभारपिंपळगाव येथे दिसून येते.

Web Title: Married woman in rural areas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.