वाळूज उद्योगनगरीत दहा दुकाने फोडणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 05:41 PM2018-11-23T17:41:27+5:302018-11-23T17:41:43+5:30
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील रांजणगाव व वाळूज भागात धुमाकूळ घालत दहा दुकाने फोडणाऱ्या टोळीतील तिघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी शुक्रवारी जेरबंद केले. सीसीटीव्हीमुळे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून, यामध्ये दोन सख्या भावासह एका विधीसंघर्ष मुलाचा समावेश आहे. चोरट्यांकडून २९ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील रांजणगाव व वाळूज भागात धुमाकूळ घालत दहा दुकाने फोडणाऱ्या टोळीतील तिघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी शुक्रवारी जेरबंद केले. सीसीटीव्हीमुळे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून, यामध्ये दोन सख्या भावासह एका विधीसंघर्ष मुलाचा समावेश आहे. चोरट्यांकडून २९ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.
या परिसरातील वाळूज व रांजणगावात पंधरवड्यापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांनी १६ नोव्हेंबरला वाळूजला दोन मेडीकल स्टोअर्स फोडून जवळपास २० हजारांचा ऐवज लांबविला होता. यानंतर रांजणगावात २० नोव्हेंबरला एकाच रात्री सात दुकाने फोडण्यात आली. यामुळे व्यवसायिक व नागरिकांत भितीचे वातावरण पसरले होते.
आठवडाभरापुर्वी साजापूर शेख जमील यांच्या घरी घरफोडी करुन चोरट्यांनी ४ लाखांची रोकड व जवळपास २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. तर बजाजनरात विष्णू मोरे यांचे घर फोडून रोख १५ हजार व जवळपास ७ तोळ्याचे सोन्याचे दागिने लांबविण्यात आले. या चोºयांच्या सत्रामुळे व्यवसायिक व नागरिकांत असुरक्षितेचे वातावरण पसरले होते. वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्वस्तरावरुन टीका झाल्याने अखेर पोलीस कामाला लागले आणि शुक्रवारी तिघांना जेरबंद करण्यात आले.ताब्यात घेतलेल्या तिघांनीही अन्य तीन साथीदारांच्या मदतीने वाळूज व रांजणगावात १० दुकाने फोडल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या ताब्यातून रोख १५ हजार, चांदीच्या जैन, अंगठ्या, कॉस्मेटिक साहित्य इत्यादी ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सापळा रचून ताब्यात घेतले
रांजणगावात एकाच रात्री सात दुकाने फोडणारे दुचाकीस्वार चोरटे ग्रामपंचायतीने मुख्य चौकात उभारलेल्या सीसीटीव्हीत कैद झाले होते. घटनेच्या रात्री सहा चोरटे विना क्रमांकाच्या दोन दुचाकींवरुन गावात फिरताना कॅमेºयाने टिपले होते. विशेष म्हणजे यातील एक चोरटा दिव्यांग होता. त्यामुळे पोलिसांनी या चोरावर लक्ष केंद्रीत. दरम्यान, या दिव्यांग असलेल्या संशयिताची माहिती पोलिसांना मिळाली. शुक्रवारी दुपारी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.
फरार तिघांचा शोध सुरु
पोलीस पथकाने पकडलेल्यांमध्ये गणेश पिंपळे (२६) व प्रदीप पिंपळे हे सख्खे भाऊ असून, त्यांच्याविरुध्द चोºया व लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यासमवेत दिव्यांग हा विधीसंघर्ष मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित तिघांचा शोध पोलीस घेत आहेत.