चोरीचे ५00 ट्रक विकणारे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 04:43 AM2018-05-05T04:43:58+5:302018-05-05T04:44:19+5:30

राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून चोरीचे ट्रक, हायवा इ. महागड्या गाड्या औरंगाबादेत आणून त्यांची संपूर्ण रंगरंगोटी करायची. बनावट चेसीस क्रमांक टाकून बीड आरटीओ कार्यालयातून पासिंग करून विकणारे राज्यस्तरीय रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे.

 Martingale selling 500 trucks for theft | चोरीचे ५00 ट्रक विकणारे जेरबंद

चोरीचे ५00 ट्रक विकणारे जेरबंद

googlenewsNext

- मुजीब देवणीकर
औरंगाबाद - राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून चोरीचे ट्रक, हायवा इ. महागड्या गाड्या औरंगाबादेत आणून त्यांची संपूर्ण रंगरंगोटी करायची. बनावट चेसीस क्रमांक टाकून बीड आरटीओ कार्यालयातून पासिंग करून विकणारे राज्यस्तरीय रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. कोट्यवधी रुपयांची ५०० वाहने विकणारा औरंगाबाद पालिकेतील नगरसेवक असून, त्याचे भाऊही यात सहभागी आहेत.
भिवंडी गुन्हे शाखेने आतापर्यंत चोरीची ७० पेक्षा अधिक वाहने जप्त केली असून, औरंगाबाद पोलिसांच्या हाती फक्त दोन वाहने लागली आहेत. पाचशेहून अधिक ट्रक विकणाऱ्या टोळीत अनेक आरोपी असून, मुख्य सूत्रधार फरार आहे.
चिकलठाणा येथे टाटा बॉडी बिल्डर या गॅरेजमध्ये चारचाकी वाहनांची डेंटिंग आणि पेंटिंग करण्यात येते. बीड येथील रिक्षा, दुचाकीचा क्रमांक त्यावर टाकण्यात येत होता. एका दिवसात चोरीच्या वाहनाची बनावट कागदपत्रेही तयार करण्यात येत होती. बीड आरटीओ कार्यालयातून हे वाहन पासिंग करून घेण्यात येत होते. ज्या ग्राहकाला वाहन विकले त्याच्याकडून पैसे घेताना या रॅकेटचा मुख्य सूत्रधार निकटवर्ती व्यक्तीचा बँक अकाऊंट नंबर देत होता. त्यावर पैसे येताच तो संबंधितांकडून घेत होता.

भिवंडी पोलिसांना यश
भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांनी ७० पेक्षा अधिक चोरीचे विकलेले ट्रक, हायवा जप्त केले आहेत. औरंगाबादेतील जिन्सी पोलीस भिवंडी पोलिसांना अजिबात सहकार्य करीत नसल्याचे समोर आले आहे. भिवंडी पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर औरंगाबाद गुन्हे शाखेनेही तपास सुरू केला.

Web Title:  Martingale selling 500 trucks for theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.