मसिआ, एनएचके संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:27 AM2017-12-04T00:27:46+5:302017-12-04T00:28:31+5:30

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ स्टेडियमवर सुरू असलेल्या व्हेरॉक औद्योगिक ट्वेंटी २0 क्रिकेट स्पर्धेत राहुल शर्मा व मधुर पटेल यांच्या तडाखेबंद अर्धशतकी खेळीच्या बळावर मसिआ संघाने युनायटेड ब्रेव्हरीज संघावर ११८ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

Masiya, NHK won the team | मसिआ, एनएचके संघ विजयी

मसिआ, एनएचके संघ विजयी

googlenewsNext
ठळक मुद्दे राहुल, मधुर, गौरव, ऋषिकेश चमकले

औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ स्टेडियमवर सुरू असलेल्या व्हेरॉक औद्योगिक ट्वेंटी २0 क्रिकेट स्पर्धेत राहुल शर्मा व मधुर पटेल यांच्या तडाखेबंद अर्धशतकी खेळीच्या बळावर मसिआ संघाने युनायटेड ब्रेव्हरीज संघावर ११८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. दुसºया सामन्यात गौरव शिंदे आणि ऋषिकेश तरडे यांच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर एनएचके संघाने हायकोर्ट संघाचा १५ धावांनी पराभव केला.
दुपारच्या सत्रात झालेल्या लढतीत मसिआ संघाने ब्रेव्हरीज संघाविरुद्ध २0 षटकांत ८ बाद २0७ धावांचा एव्हरेस्ट रचला. त्यांच्याकडून शैलीदार फलंदाज राहुल शर्माने अवघ्या ५४ चेंडूत २ षटकार व १0 चौकारांसह ८१ आणि मधुर पटेलने ३८ चेंडूंतच ८ टोलेजंग षटकार व ५ चौकारांसह ७७ धावांची स्फोटक खेळी केली. युनायटेड ब्रेव्हरीजकडून मनोहर सनेर याने ९ धावांत ५ बळी घेतले. पंकज फलके व श्रीकांत शिंदे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात युनायटेड ब्रेव्हरीज ८९ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून संदीप गायकवाड (३४) व पंकज फलके (१२) हेच दोघे दुहेरी आकडी धावसंख्या पार करू शकले. मसिआकडून हितेश पटेल, मंगेश, मयूर चौधरी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात एनएचके संघाने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ४ बाद १७५ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून उदयोन्मुख शैलीदार फलंदाज गौरव शिंदेने ५९ चेंडूंतच ९ चौकार व एका षटकारासह नाबाद ८0 आणि ऋषिकेश तरडे याने ५२ चेंडूंत ३ षटकार व ७ चौकारांसह ७३ धावांची खेळी केली. हायकोर्ट संघाकडून सचिन जैस्वाल व विजय देशमुख यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात हायकोर्ट संघाने चांगली झुंज दिली; परंतु त्यांचा संघ १८.५ षटकांत १६0 धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून साईसागर अंबिलवादे याने ७ चौकारांसह ३८ व ज्ञानेश्वर पाटीलने २४ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ३६ धावा केल्या. एनएचके संघाकडून ऋषिकेश तरडे व गौरव शिंदे यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.

Web Title: Masiya, NHK won the team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.