क्षयरोग दिनानिमित्त जनजागरण रॅली,चित्र प्रदर्शन
By Admin | Published: March 25, 2017 11:35 PM2017-03-25T23:35:09+5:302017-03-25T23:37:07+5:30
जालना : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शुक्रवारी जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने जनजागरण रॅली काढण्यात आली.
जालना : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शुक्रवारी जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने जनजागरण रॅली काढण्यात आली. गांधी चमन येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला.
याप्रसंगी डॉ. सुमित्रा गादिया, विष्णू पिवळ, डॉ. ए. जी. सोळंके, डॉ. योगेश सूरळकर, डॉ. आय. के. जाहागिरदार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, नर्सिंग कॉलेज, परिचर्या प्रशिक्षण केंद्राचे विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्ही. एस. वायभट यांनी केले. क्षयरोगाच्या जंतुचे संशोधक डॉ. रॉबर्ट कॉच यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कार्यरत असलेल्या खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांना डॉट सेंटर चालवून क्षय रुग्णांना नियमित औषधोपचार दिल्याबद्दल त्यांचा डॉ. पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
दोन आठवड्यांपेक्षा जास्तकाळ खोकला असणाऱ्या व्यक्ंितनी जवळच्या शासकीय रुग्णालयात थुंकी तपासणी करणे
आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
डॉ. रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोग जंतुचा शोध लावला. त्यामुळे समाजात या आजाराबाबत रुढ असलेल्या अंधश्रध्देचे निवारण होऊ शकले, असे डॉ. ए. जी. सोळंके यांनी सांगितले.
क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी प्रदर्शनही भरवण्यात आाले. तसेच स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने पोस्टर्स, हॅण्डबील वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस. पी. संभारे, एस. एस. खंडागळे, एस. व्ही. यादव, विष्णू पिवळ, एम. आर. पवार आदींनी परिश्रम घेतले.