अनैतिक संबंधातून घडले हत्याकांड

By Admin | Published: December 11, 2014 12:29 AM2014-12-11T00:29:58+5:302014-12-11T00:31:17+5:30

जिंतूर :अनैतिक संबंध ठेऊ नको असे वारंवार सांगूनही मयत महिलेने इतरांसोबत अनैतिक संबंध ठेवल्याने महिला व तिची लहान मुलगी या दोघींची हत्या केल्याची खळबळजनक कबुली आडगाव हत्याकांड प्रकरणातील आरोपीने दिली

Massacre caused by immorality | अनैतिक संबंधातून घडले हत्याकांड

अनैतिक संबंधातून घडले हत्याकांड

googlenewsNext

जिंतूर : इतर व्यक्तींशी अनैतिक संबंध ठेऊ नको असे वारंवार सांगूनही मयत महिलेने इतरांसोबत अनैतिक संबंध ठेवल्याने महिला व तिची लहान मुलगी या दोघींची हत्या केल्याची खळबळजनक कबुली आडगाव हत्याकांड प्रकरणातील आरोपीने दिली आहे़
जिंतूर तालुक्यातील आडगाव येथे ६ डिसेंबरच्या पहाटे रामप्रसाद दाभाडे यांच्या शेतावरील आखाड्यावर नंदाबाई रामप्रसाद दाभाडे (वय ३०), आरती रामप्रसाद दाभाडे (३) या दोघींची हत्या झाली होती़ याप्रकरणी पोलिसांनी शेतात काम करणारा बाळू उर्फ पांडुरंग दाभाडे, फिर्यादी रामप्रसाद दाभाडे याची प्रियसी हेमलता जाधव हिच्यासह शेतातील गडी अडप यांना ताब्यात घेतले होते़ पोलिस अधीक्षक अनंत रोकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे, पोलिस निरीक्षक के़ पी ओव्हळ, स्थागुशाचे विवेक मुगळीकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी आरोपीची वेगवेगळ्या प्रकारे चौकशी केली़ श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले़ शेतात गडी म्हणून काम करणाऱ्या बाळू उर्फ पांडुरंग दाभाडे जो की फिर्यादी रामप्रसाद दाभाडेचा पुतण्या आहे, त्याच्या भोवती संशयाची चके्र फिरली़ पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला़ त्याने गुन्ह्याची कबुली देताना म्हटले आहे की, मंदाबाई आखाड्यावर आल्यानंतर तिच्याबद्दल मला आकर्षण निर्माण झाले़ म्हणूनच मी रामप्रसाद दाभाडे यांच्या शेतावर गडी म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. ६ हजार महिन्यांवर काम करीत असताना अनेकवेळा पगाराची अपेक्षा केली नाही़ मला नंदाबाई दाभाडे हिच्याशी संबंध प्रस्थापित करायचे होते़ रामप्रसाद दाभाडे नसल्यानंतर मी तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला़ त्यातूनच आमचे संबंध निर्माण झाले़ नंदाबाई दाभाडे हिला मी वारंवार सांगितले की, नवरा रामप्रसाद दाभाडे व मला सोडून दुसऱ्यांशी संबंध ठेऊ नको, परंतु, नंदाबाईने ऐकले नाही़ काही दिवसांपूर्वी त्या भागातील व्यापाऱ्याशी नंदाबाईचे संबंध चालू असताना पांडुरंगने बघितले होते़ त्यानंतर पांडुरंगने नंदाबाईला खतम करण्याचा विडा उचलला व ६ डिसेंबर रोजी रात्री अडीचच्या सुमारास कुऱ्हाडीचे घाव घालून नंदाबाईची हत्या केली़ तर तीन वर्षांची मुलगी आरती हिचा गळा दाबून खून केल्याची खळबळ जनक कबुली आरोपीने जिंतूर पोलिसांना दिली़ आरोपी पांडुरंग दाभाडे याला १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असून, अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: Massacre caused by immorality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.