मसापचे वार्षिक वाङ्मय पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:48 AM2017-08-29T00:48:55+5:302017-08-29T00:48:55+5:30
मसापचे वार्षिक वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दि. २९ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद येथे हे पुरस्कार डॉ. गो. मा. पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मसापचे वार्षिक वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दि. २९ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद येथे हे पुरस्कार डॉ. गो. मा. पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील.
मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले आणि कार्यवाह डॉ. दादा गोरे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. पुरस्कार निवड समितीत प्रा. शेषराव मोहिते, विजयकुमार करजकर, प्रा. जयद्रथ जाधव, डॉ. सुरेश सावंत, संगीता मोरे, डॉ. दादा गोरे, के.एस. अतकरे व जीवन कुलकर्णी यांचा समावेश होता. केवळ मराठवाड्यातील लेखक-कवींसाठी असलेल्या नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार केशव वसेकर यांच्या ‘पाऊलवाट’ या ग्रंथास जाहीर झाला आहे. मराठीतील समीक्षा व वैचारिक लेखनासाठी देण्यात येणारा यंदाचा प्राचार्य म. भि. चिटणीस वाङ्मय पुरस्कार डॉ. विलास खोले, पुणे यांच्या ‘विलोकन’ या ग्रंथास देण्यात येणार आहे. मराठीतील उत्कृष्ट कविता लेखनासाठी दिला जाणारा कै. कुसुमताई देशमुख काव्य पुरस्कार कवी ना. तु. पोघे, औरंगाबाद यांच्या ‘बिनचेहºयांचे अभंग’ या कवितासंग्रहास देण्यात येणार
आहे.
या वर्षापासून मसापने कादंबरी लेखनासाठी बी. रघुनाथ वाङ्मय पुरस्कार सुरू केला आहे. यंदाचा हा पुरस्कार प्रवीण दशरथ बांदेकर लिखित ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीस जाहीर करण्यात आला, तसेच ग्रामीण भागात मराठी ग्रंथ व्यवहारात महत्त्वाचे कार्य करणाºया शब्दालय प्रकाशनच्या सुमती लांडे यांना देण्यात येणार आहे. १९८९ पासून त्यांनी ५०० च्या वर ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत.