छत्रपती संभाजीनगरमधील आलिशान हॉटेल ग्रँड सरोवरला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 21:27 IST2025-04-10T21:26:29+5:302025-04-10T21:27:08+5:30

आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू.

Massive fire breaks out at luxurious Hotel Grand Sarovar in Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरमधील आलिशान हॉटेल ग्रँड सरोवरला भीषण आग

छत्रपती संभाजीनगरमधील आलिशान हॉटेल ग्रँड सरोवरला भीषण आग


छत्रपती संभाजीनगर: सोलापूर धुळे महामार्गावर तीसगावजवळील हॉटेल ग्रँड सरोवर याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. रात्री 8 वाजेच्या सुमारास ही आग लागली असून, अगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीत हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरल्याचे पाहायला मिळत आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, चार बंबाच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही, आग हॉटेलच्या किचनमधून लागल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हे हॉटेल शिवसेना(शिंदे गट) आमदार प्रदीप जयस्वाल यांचे असल्याची माहिती आहे.

Web Title: Massive fire breaks out at luxurious Hotel Grand Sarovar in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.