सोनाली गायकवाड यांना ‘मॅट’ चा दिलासा
By | Published: November 29, 2020 04:04 AM2020-11-29T04:04:37+5:302020-11-29T04:04:37+5:30
डाॅ. सोनाली गायकवाड यांना दंत महाविद्यालयातील रिक्त असलेल्या सहाय्यक प्राध्यापक (कृत्रिम दंतशास्त्र ) या पदावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती ...
डाॅ. सोनाली गायकवाड यांना दंत महाविद्यालयातील रिक्त असलेल्या सहाय्यक प्राध्यापक (कृत्रिम दंतशास्त्र ) या पदावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात आली होती . डाॅ. गायकवाड यांना ५ सप्टेंबर २०१८ पासून एक किंवा २ दिवसांचा तांत्रिक खंड देऊन वेळोवेळी सेवा सातत्य देण्यात आले आहे. शासनाने २० ऑक्टोबर २०२० च्या आदेशाद्वारे त्यांना ३० ऑक्टोबर २०२० पासून पुन्हा १२० दिवसासाठी २८ फेब्रुवारी २०२१ पर्यत नेमणूक दिली आहे. अर्जदाराप्रमाणे तात्पुरती नेमणूक दिलेल्या अध्यापकांना सेवेत कायम करण्यासाठी शासनाने माहिती मागविली होती .सदर प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून त्यावर आजपर्यंत निर्णय घेतला नाही.
दरम्यान शासनाने ६ नोव्हेंबर २०२० रोजी बंधपत्रित विद्यार्थीची नवीन तात्पुरती यादी जाहीर करुन डाॅ. गायकवाड यांच्या जागेवर नियुक्ती करण्यात आली . सदर नेमणुकीस डाॅ. गायकवाड यांनी ॲड.शामसुंदर बी पाटील यांच्या मार्फत आव्हान दिले होते . मूळ अर्जावर व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेऊन न्यायाधिकरणाने नवीन नेमणूक आदेशास स्थगिती देऊन अर्जदारास पुढील तारखेपर्यंत सेवेत ठेवण्याचे आदेश दिले . शासनास नोटीस काढून लेखी म्हणणे सादर करण्यास वेळ दिला.