मौलाना आझाद राजकीय क्षीतिजावरील मोठे व्यक्तिमत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:06 AM2021-02-23T04:06:57+5:302021-02-23T04:06:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील देशाचे नेतृत्व करणारे राजकीय क्षीतिजावरील प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न मौलाना ...

Maulana Azad is a big personality on the political horizon | मौलाना आझाद राजकीय क्षीतिजावरील मोठे व्यक्तिमत्व

मौलाना आझाद राजकीय क्षीतिजावरील मोठे व्यक्तिमत्व

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील देशाचे नेतृत्व करणारे राजकीय क्षीतिजावरील प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद होय, असे मत महापालिकेचे उपायुक्त सुमंत मोरे यांनी सोमवारी व्यक्त केले.

मौलाना आझाद संशोधन केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद महानगरपालिका, लोकसेवा कला व विज्ञान महाविद्यालय, चिश्तिया कला व विज्ञान महाविद्यालय, खुल्ताबाद यांच्यातर्फे ‘मौलाना अबुल कलाम आझाद सांस्कृतिक पत्रकारिता, साहित्यिक व्यक्तिमत्व’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी महापालिकेचे उपायुक्त मोरे यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

यावेळी व्यासपीठावर डॉ. हमीद खान, डॉ. ए. जी. खान, डॉ. लियाकत, डॉ. शेख एजाज उपस्थित होते. डॉ. लियाकत यांनी प्रास्ताविक केले तर मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रांची रुपरेषा डॉ. हमीद खान यांनी स्पष्ट केली. प्रमुख मार्गदर्शक हैदराबाद विद्यापीठाचे कुलसचिव अब्दुल सिद्दीकी, कर्नाटक येथील डॉ. फैयाज अहमद यांनी मौलाना आझाद यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेतला. डॉ. परवेझ अस्लम शेख यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी सहभागी संशोधकांनी शोधनिबंध सादर केले. डॉ. मुस्तजीब खान यांनी सत्राचे अध्यक्षपद भूषविले. डॉ. शिल्पा खोत, डॉ. सिद्दीकी अफरोज खातून, प्रा. सुनील जाधव यांच्यासह आठजणांनी आपले शोधनिबंध सादर केले. प्रा. आर्शिया कादरी यांनी द्वितीय सत्राचे सूत्रसंचालन केले तर डॉ. सुभाष बागल यांनी आभार मानले.

Web Title: Maulana Azad is a big personality on the political horizon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.