घाटीच्या भिंतींनाही फुटला मायेचा पाझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:02 AM2020-12-22T04:02:06+5:302020-12-22T04:02:06+5:30

संतोष हिरेमठ औरंगाबाद : स्थळ घाटीतील ग्रंथालयासमोरील रस्ता. अंध ज्येष्ठाला कोणीतरी घाटीत सोडून गेले. संपूर्ण चेहऱ्यावर रुमाल बांधून हा ...

Maya's perforation also burst the walls of the valley | घाटीच्या भिंतींनाही फुटला मायेचा पाझर

घाटीच्या भिंतींनाही फुटला मायेचा पाझर

googlenewsNext

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : स्थळ घाटीतील ग्रंथालयासमोरील रस्ता. अंध ज्येष्ठाला कोणीतरी घाटीत सोडून गेले. संपूर्ण चेहऱ्यावर रुमाल बांधून हा ज्येष्ठ रस्त्यावर बसून होता. अंध्वत्वाने विद्रुप झालेले डोळे कोणाला दिसू नये, म्हणून रुमाल बांधलेला. नातेवाईकांनी साथ सोडली, तरी आपल्याला कोणीच नाही म्हणून ‘तो’ त्यांचे नावही घेत नव्हता. हे दृश्य पाहून घाटीच्या कर्मचाऱ्यांनाच काय भिंतींनाही मायेचा पाझर फुटला.

घाटीत रस्त्याच्या कडेला उन्हात हा ज्येष्ठ संपूर्ण चेहरा रूमालाने झाकून बसला होता. येथे येणारे-जाणारे क्षणभर थांबत होते. काहींनी शंका म्हणून विचारणा केली, तेव्हा डोळे नसल्याने रूमाल बांधल्याचे त्या ज्येष्ठाने सांगितले. तरीही कोणाला विश्वास बसत नव्हता. शेवटी ‘त्या’ ज्येष्ठाने रूमाल हटविला आणि अंधत्वाचा पुरावाच दाखविला. हे दृश्य पाहणारे क्षणभर स्तब्धच झाले. परिचारिका संगीता सावंत यांनी ज्येष्ठाला रस्त्यावरून उचलून सावलीत बसविले. कोण आहे, कोणी सोडले, अशी त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली. मात्र, आपल्याला कोणीच नाही, असे सांगत त्यांनी घरच्यांविषयी माहिती देण्याचे टाळले. घाटीत ज्येष्ठांना सोडण्याच्या प्रकाराने प्रत्येक जण हळहळ व्यक्त करीत होता, जमेल तशी मदत करीत होता.

पुनर्वसनासाठी प्रयत्न

वृद्धांची मुले, नातेवाईकच त्यांना घाटीत सोडून जात असल्याचे दिसून येत आहे. दर महिन्याला किमान पाच-सहा अनोळखी लोकांना तरी घाटी परिसरात सोडून देण्यात येते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे म्हणाले, काही दिवसांपूर्वीच बेवारस लोकांचे मनपाच्या मदतीने पुनर्वसन करण्यात आले होते. परंतु पुन्हा नवीन लोक घाटीत सोडण्यात आले आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठीही प्रयत्न केला जाईल.

आई-वडिलांनी केला सांभाळ

माझे कोणी नाही, आई-वडील होते, तोपर्यंत त्यांनी माझा सांभाळ केला. ते वारल्यानंतर असेच जगत आहे, असे त्या अंधाने सांगितले. कुठे राहतो, हे सांगणेही त्यास कठीण झाले होते.

फोटो ओळ..

घाटी परिसरात सोडलेल्या ज्येष्ठाशी संवाद साधताना परिचारिका.

घाटी परिसरात अशाप्रकारे बेवारस व्यक्तींनी आधार घेतला आहे.

Web Title: Maya's perforation also burst the walls of the valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.