महापौर व अधिकाऱ्यांना चिखलातून शोधावी लागली वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:27 AM2019-07-12T00:27:53+5:302019-07-12T00:28:11+5:30
सातारा, देवळाई परिसरात कोणतीच सेवासुविधा न देणाºया महापालिकेने गुरुवारपासून मालमत्ता कर आकारणी व कर वसुलीसाठी कार्यालय सुरू केले. या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेले महापौर नंदकुमार घोडेले व अधिकाऱ्यांना या कार्यालयापर्यंत चिखल तुडवत जावे लागले. मनपाच्या अजब कारभारावर नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
औरंगाबाद : सातारा, देवळाई परिसरात कोणतीच सेवासुविधा न देणाºया महापालिकेने गुरुवारपासून मालमत्ता कर आकारणी व कर वसुलीसाठी कार्यालय सुरू केले. या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेले महापौर नंदकुमार घोडेले व अधिकाऱ्यांना या कार्यालयापर्यंत चिखल तुडवत जावे लागले. मनपाच्या अजब कारभारावर नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
परिसरातील प्रश्नांची सोडवणूक करा आणि खुशाल कर वसूल करा त्यासाठी नागरिकांचा काडीमात्र विरोध राहणार नाही; परंतु मनपाने आयप्पा मंदिर रोडवरील सत्कर्मनगरात मालमत्तेला कर आकारणी व वसुलीसाठी कार्यालयाचे उद्घाटन केले आहे. या कार्यालयापर्यंत येताना चिखलातून महापौर व अधिकाºयांना वाट काढावी लागली. शहरात असूनदेखील खेड्यात वास्तव्यास आहोत की काय, असा प्रश्न येथील नागरिकांना दररोज भेडसावतो, मग सांगा कर कोणत्या कारणांनी द्यायचा, असा सवाल यावेळी नागरिकांनी उपस्थित केला आहे.