महापौैर, आयुक्त काका... प्राणिसंग्रहालय वाचवा हो...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:50 PM2018-12-11T22:50:46+5:302018-12-11T22:50:53+5:30
सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यांची योग्य काळजी घ्यावी, त्यांना नैसर्गिक वातावरण उपलब्ध करून द्यावे. प्राणिसंग्रहालयाची परवानगी रद्द होऊ नये यासाठी ठोस पाऊल उचलण्यात यावे, अशी मागणी आज शालेय विद्यार्थ्यांनी विविध प्राण्यांची वेषभूषा धारण करून महापौैर, आयुक्तांकडे केली.
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यांची योग्य काळजी घ्यावी, त्यांना नैसर्गिक वातावरण उपलब्ध करून द्यावे. प्राणिसंग्रहालयाची परवानगी रद्द होऊ नये यासाठी ठोस पाऊल उचलण्यात यावे, अशी मागणी आज शालेय विद्यार्थ्यांनी विविध प्राण्यांची वेषभूषा धारण करून महापौैर, आयुक्तांकडे केली. निसर्ग आणि प्राण्यांसाठी काम करणाऱ्या गुरू जांभेश्वर संस्थेनेही आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
‘द इव्हॉलविंग मार्इंडस् प्री-स्कूल’ शाळेतील अत्यंत छोट्या-छोट्या मुलांनी मागील आठवड्यात सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयास भेट दिली. आपल्या प्राणिमित्रांची दयनीय अवस्था पाहून विद्यार्थ्यांच्या मनावर तीव्र आघात झाला. मुक्या प्राण्यांची काळजी महापालिकेने चांगल्या पद्धतीने घ्यावी, प्राणिसंग्रहालयाची परवानगी रद्द होऊ नये म्हणून चिमुकल्यांनी विविध प्राण्यांची वेषभूषा करून थेट महापालिकेत आपल्या शिक्षकांसह दाखल झाले. त्यांनी महापौैर नंदकुमार घोडेले यांची भेट घेऊन प्राण्यांची योग्य देखभाल करावी, त्यांना नैसर्गिक वातावरण निर्माण करून द्यावे, अशी मागणी केली. यावेळी ‘लोकमत’चे उपाध्यक्ष संदीप विश्नोई यांनी विद्यार्थ्यांच्या भावना विषद केल्या. महापौर घोडेले यांनी आश्वासित केले की, प्राणिसंग्रहालयाची परवानगी अजिबात रद्द होणार नाही. बुधवारी सकाळीच मनपाचे शिष्टमंडळ दिल्लीत प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या कारवाईविरोधात अपील दाखल करणार आहे. महापालिकेला निश्चित स्थिगितीही मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर महापौर आणि आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना बिष्णोई समाज पर्यावरण संवर्धनासाठी कशा पद्धतीने काम करीत आहे, याची माहिती देण्यात आली. गुरू जांभेश्वर संस्थेतर्फे विविध मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले. यावेळी मन्नत, विराज, आराध्य, आराध्या, तनिष्क, हितांशी, विवान, ऋतुजा, आर्यन, स्वरा, नायसा, मिशिका या चिमुकल्यांची उपस्थिती होती. शाळेच्या प्राचार्या निरूपमा बाफनाही यावेळी उपस्थित होत्या.