अभियांत्रिकीनंतर आता ‘एमबीए’चे रॅकेट झाले उघड...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:54 AM2018-01-02T00:54:08+5:302018-01-02T00:54:12+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येणाºया व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षेतील घोटाळ्यांची मालिका या परीक्षेतही कायम राहिली. मागील परीक्षेच्या वेळी अभियांत्रिकीचा झालेला पेपर नगरसेवकाच्या घरी पुन्हा लिहिताना विद्यार्थ्यांना अटक केली होती. यावेळी एमबीएच्या परीक्षेत कार्यरत असणारे रॅकेट उघडकीस आले आहे. या रॅकेटचे धागेदोरे परीक्षा भवनपर्यंत पोहोचत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येणाºया व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षेतील घोटाळ्यांची मालिका या परीक्षेतही कायम राहिली. मागील परीक्षेच्या वेळी अभियांत्रिकीचा झालेला पेपर नगरसेवकाच्या घरी पुन्हा लिहिताना विद्यार्थ्यांना अटक केली होती. यावेळी एमबीएच्या परीक्षेत कार्यरत असणारे रॅकेट उघडकीस आले आहे. या रॅकेटचे धागेदोरे परीक्षा भवनपर्यंत पोहोचत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विद्यापीठातर्फे पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा २६ डिसेंबरपासून घेण्यात येत आहेत. या अभ्यासक्रमांच्या परीक्षा ६ केंद्रांवर घेण्यात येत आहेत. यात औरंगाबाद शहरातील वसंतराव नाईक महाविद्यालय आणि दुसºया एका महाविद्यालयाचा समावेश आहे. वसंतराव नाईक महाविद्यालयात एमबीएची परीक्षा ४५७ विद्यार्थी देत होते. सोमवारी ‘अकाऊंटिंग फॉर मॅनेजर्स’ या विषयाची परीक्षा १० ते १ या वेळेत होती. महाविद्यालयातील हॉल क्रमांक ६ मध्ये परीक्षा देत असलेल्या शे. अजमद कलीम याने अवघ्या सहाव्या मिनिटालाच प्रश्नपत्रिकेचा स्नॅप काढत व्हॉटस्अॅपच्या ‘फ्यूचर मॅनेजर्स’ ग्रुपवर टाकला. या ग्रुपमध्ये तब्बल १४२ सदस्य आहेत. यातील अवघे तीन सदस्य सोडता सगळे सदस्य ग्रुप अॅडमिन आहेत. या ग्रुपमधील सदस्य असलेले योगेश भवरे आणि मुज्जू शेख या दोघा जणांना वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या परिसरातच पुस्तकांमधून उत्तरे शोधत असताना महाविद्यालयाच्या कर्मचाºयांनी पकडले. त्यांच्याकडील मोबाईल तपासल्यानंतर प्रश्नपत्रिका आढळून आली. तेव्हा कर्मचारी रवींद्र गवळी, सतीश पवार आणि हनुमंत कोरडे या तिघांनी दोन्ही विद्यार्थ्यांना प्राचार्यांच्या केबिनमध्ये आणून बसवले.
त्यांच्याकडील व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये प्रश्नपत्रिका टाकलेल्या डीपीवरून परीक्षा हॉलची पाहणी केली असता शेख अजमद कलीम हा सापडला. त्यांच्याकडून या सर्व गोष्टींचा उलगडा झाला.
परीक्षा भवनातील
अधिकाºयांचा वरदहस्त
विद्यापीठाच्या परीक्षा भवनमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाºयांचा परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करू नये, असा दबाव असल्याचे समोर येत आहे. वसंतराव नाईक महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातच दोन दिवसांपूर्वी एका प्राध्यापकाने कॉपी करणाºया विद्यार्थ्यांवर कडक कारवाई केली होती. यानंतर त्या प्राध्यापकालाच परीक्षेच्या कामकाजापासून दूर ठेवण्यात आले. या प्रकारानंतर परीक्षा संचालक डॉ. नेटके यांनी परीक्षा भवनातील सहभागी अधिकाºयांची नावे गोपनीय पद्धतीने देण्याचे आवाहन प्राध्यापकांना केले आहे.
अधिष्ठातांचा हस्तक्षेप?
वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या परीक्षेत विज्ञान शाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मजहर फारुकी यांचा मुलगा परीक्षा देत असल्यामुळे त्यांचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोपही एका प्राध्यापकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. डॉ. फारुकी यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी परीक्षा केंद्रावर येऊन पेपर रद्द करण्याची घोषणा केली. तसेच दुसरी प्रश्नपत्रिका अर्ध्या तासात उपलब्ध करून पुन्हा परीक्षा घेण्याची तयारी दाखविली. मात्र विद्यार्थ्यांनी लागलीच पेपर घेण्यास विरोध दर्शविला. आम्हाला परीक्षाही नको, पासिंगचे मार्क द्या.. अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. मात्र यातून कोणताही तोडगा निघाला नाही. यामुळे विद्यार्थ्यांनी प्रशासन, कुलगुरू यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेवटी पोलिसांना पाचारण करून विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून बाहेर काढावे लागले.
एमबीएचा पेपर फुटल्यामुळे पेपर रद्द केला आहे. आता हा पेपर पुन्हा नव्याने घेण्यात येईल. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. जो दोषी असेल त्याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे.
- डॉ. दिगंबर नेटके,
परीक्षा संचालक