दरोडा प्रकरणी १५ आरोपींवर मोक्का
By Admin | Published: February 15, 2015 12:51 AM2015-02-15T00:51:30+5:302015-02-15T00:58:16+5:30
लातूर : नोव्हेंबरमध्ये औसा तालुक्यातील आशिव ते उजनी शिवारातील अतिथी बारवर धाडसी दरोडा टाकणाऱ्या १५ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे़
लातूर : नोव्हेंबरमध्ये औसा तालुक्यातील आशिव ते उजनी शिवारातील अतिथी बारवर धाडसी दरोडा टाकणाऱ्या १५ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे़ नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अमितेशकुमार यांच्या सूचनेनुसार औरंगाबाद विशेष मोक्का न्यायालयासमोर ६ फेब्रुवारी रोजी हजर करताच त्या आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी पत्रपरिषदेत दिली़
या प्रकरणातील सुरेश माणिक पवार (वय ३५, रा़ कोल्हेगाव पेढी जि़उस्मानाबाद) शरद भिक्कड (वय २५, रा. देवळाली ताक़ळंब), बबन काळे (वय २५, रा़मोहा), बापू काळे (वय २५, राग़ायरान पारधी पेढी इटकुर), दत्ता काळे (वय ३२,रा़मोहा), सुनिल चव्हाण (वय २७, रा़ढोकी़ता़उस्मानाबाद), नारायण मोराठे (वय २६, रा़वडजी, ताक़ळंब) या ७ जणांना गुन्हा करुन पळून जात असताना पोलीस कर्मचारी व बोरगाव नकुलेश्वर येथील ग्रामस्थांनी वाहन व मुद्देमालासह त्यांना पकडले आहे़ तर याच गुन्ह्यांतील महावीर उर्फ अण्णा सदाशिव इंगळे (वय ३१, रा़साळेगाव, ताक़ेज) यास १२ नोव्हेंबर रोजी तर पुण्या उर्फ बालाजी उर्फ अनिल शिंदे (वय २६, रा़मोहा) यास २६ नोव्हेंबर रोजी युवराज अशोक उपळाईकर (वय ३५, रा़ तेलगिरणी चौक, रेल्वेस्टेशन बार्शी) यास २२ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली़ शिवाय अनिल पवार उर्फ बल्या (रा़साळेगाव, ताक़ेज), रावजी काळे (रा़मोहा), कालीदास काळे, लक्ष्मण काळे, बबन काळे हे पाच आरोपी अद्यापही फरार आहेत़ या आरोपींना संघटीत टोळीने आर्थिक फायद्यासाठी जबरी चोऱ्या, दरोडे अशा स्वरुपाचे अनेक गुन्हे केले होते़
या आरोपींविरुद्ध राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत खंडणी, अपहरण, शस्त्राचा वापर करुन दरोड्यासारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले़ त्यामुळे या आरोपींविरुद्ध कठोर स्वरुपाची कारवाई होणे आवश्यक होते़ त्या दृष्टीने पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार गुन्ह्यात सहभागी झालेल्या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक अधिनियम १९९९ मोक्का अन्वये कारवाई करणे बाबतचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड यांच्याकडे पाठविण्यात आला होता़
त्याची दखल घेऊन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अमितेश कुमार यांनी सर्व आरोपींविरुद्ध मोक्का कायद्याच्या कलम ३ (१) (२) ३ (२), ३ (४) लावण्याची परवानगी दिली असून, सुरेश पवार व त्यांच्या सहकार्यांना औरंगाबाद येथील मोक्का न्यायालयासमोर हजर करताच १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली़ (प्रतिनिधी)
लातूर जिल्ह्यात असंघटीत गुन्हे करणाऱ्या टोळी व टोळीतील क्रियाशील गुन्हेगारांविरुद्ध मोक्का कायदा लावण्याचे लातूर जिल्ह्याच्या इतिहासातील ही सहावी घटना आहे़ त्यामुळे यापुढेही अशा प्रकारचे संघटीत गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करणार असल्याचेही जिल्हा पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले़
काय आहे मोक्का़़़
४यामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक अधिनियम १९९९ (मोक्का) अन्वये आरोपीस ५ लाखाचा दंड, ५ वर्षांची शिक्षा व या कारवाई अंतर्गत आरोपींना जामीन होत नाही़ अशी गंभीर स्वरुपाची कारवाई मोक्का अंतर्गत होत असल्याची माहिती औशाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल महाबोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़