जोखीमग्रस्त ७२ गावांत ‘साथरोग’ नियंत्रणाचे उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:39 AM2017-08-29T00:39:53+5:302017-08-29T00:39:53+5:30
जिल्हा आरोग्य विभागातर्फे साथरोग नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. ज्या गावात गॅस्ट्रोचे रूग्ण आढळून आले किंवा पूर्वी लागण असलेली गावे जोखमीची घोषित केली असून सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील ७२ गावांमध्ये साथरोग संदर्भात अत्यावश्यक उपाय-योजना केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा आरोग्य विभागातर्फे साथरोग नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. ज्या गावात गॅस्ट्रोचे रूग्ण आढळून आले किंवा पूर्वी लागण असलेली गावे जोखमीची घोषित केली असून सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील ७२ गावांमध्ये साथरोग संदर्भात अत्यावश्यक उपाय-योजना केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी सांगितले.
साथरोगाचा प्रसार होऊ नये, यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत खबरदारी घेतली जात आहे. शिवाय जिल्हा, तालुका व प्राथमिक आरोग्य स्तरावर एकूण २९ साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आली आहेत. पावसाळ्यामध्ये पसरणाºया साथरोगाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू असले तरी ग्रामीण भागात साथरोगाबाबत हवी तेवढी जनजागृती नाही. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी रूग्णांची गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवाय जिल्हा रूग्णालयातही उपचारासाठी रूग्णांच्या रांगाच रांगा आहेत. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे आजार बळावले जातात. त्यामुळे साथरोग उदभवू नये यासाठी शुद्ध पाणी प्यावे, परिसर स्वच्छ ठेवणे, नाल्या, गटारी, डबकी साचु न देणे, आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा. अतिसार, थंडी ताप किंवा इतर आजार जडल्यास उपचारासाठी तत्काळ रूग्णालय जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. साथरोगाचा संशयीत रूग्ण आढळुन आल्यास आरोग्य विभागाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले.