एम.एस.ई.डी.सी.एल., कम्बाइन बँकर्स विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 01:27 AM2017-11-23T01:27:33+5:302017-11-23T01:29:11+5:30

एडीसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या व्हेरॉक औद्योगिक टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत एम.एस.ई.डी.सी.एल. आणि कम्बाइन बँकर्स संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. अष्टपैलू कामगिरी करणारे स्वप्नील चव्हाण व प्रदीप जगदाळे हे सामनावीर ठरले. या दोघांप्रमाणेच युवा फलंदाज सचिन लव्हेरा व राजेश कीर्तिकर यांनीही आजचा दिवस गाजवला.

 M.E.D.C.L. won the Combine Bankers | एम.एस.ई.डी.सी.एल., कम्बाइन बँकर्स विजयी

एम.एस.ई.डी.सी.एल., कम्बाइन बँकर्स विजयी

googlenewsNext

औरंगाबाद : एडीसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या व्हेरॉक औद्योगिक टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत एम.एस.ई.डी.सी.एल. आणि कम्बाइन बँकर्स संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. अष्टपैलू कामगिरी करणारे स्वप्नील चव्हाण व प्रदीप जगदाळे हे सामनावीर ठरले. या दोघांप्रमाणेच युवा फलंदाज सचिन लव्हेरा व राजेश कीर्तिकर यांनीही आजचा दिवस गाजवला.
सकाळच्या सत्रात स्वप्नील चव्हाण याने ४२ चेंडूंतच ३ षटकार व ५ चौकारांसह ठोकलेल्या ६७ धावांच्या बळावर एम.एस.ई.डी.सी.एल.ने मनपा संघाविरुद्ध २० षटकांत ६ बाद १६७ धावा ठोकल्या. सचिन पाटीलने २२ व संतोष आव्हाळे याने १७ धावा केल्या. मनपा संघाकडून कर्मवीर लव्हेराने २, तर दीपक जावळे, अल्ताफ खान व प्रवीण क्षीरसागर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात सचिन लव्हेराच्या ३४ चेंडूंतील ३ षटकार व ७ चौकारांसह फटकावलेल्या ६० धावांनंतरही मनपाचा संघ १२४ धावांत गारद झाला. प्रवीण क्षीरसागरने २१ धावा केल्या. एम.एस.ई.डी.सी.एल.कडून स्वप्नील चव्हाणने ४ व कैलास शेळकेने ३ गडी बाद केले.
दुसºया सामन्यात कम्बाइन बँकर्सने २० षटकात ५ बाद १७२ धावा केल्या. त्यांच्याकडून राजेश कीर्तिकरने २१ चेंडूंतच ४ षटकार व ५ चौकारांसह नाबाद ५३ धावा केल्या. प्रदीप जगदाळेने ३१ चेंडूंत ८ चौकार व एका षटकारासह ५१, दिनेश कुंटेने २८ व जितेंद्र पेंडकरने १९ धावा केल्या. पी.डब्ल्यू.डी.कडून मनोज दाभाडेने ३ गडीबाद केले. प्रत्युत्तरात पी.डब्ल्यू.डी. स्ट्रायकर्सने ९ बाद १४९ धावा केल्या. त्यांच्याकडून नीरज शिमरेने ३० व मनोज दाभाडेने २५ धावा केल्या. कम्बाइन बँकर्सकडून मिलिंद पाटील, प्रदीप जगदाळे, महेंद्रसिंग कानसा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

Web Title:  M.E.D.C.L. won the Combine Bankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.