वैद्यकीय प्रतिनिधी, शहर पोलीस अ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:48 AM2018-04-01T00:48:50+5:302018-04-01T00:49:23+5:30

एमजीएमवर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस अ संघाने जॉन्सन अँड जॉन्सन संघावर, वैद्यकीय प्रतिनिधी क संघाने युनायटेड संघावर आणि वैद्यकीय ब संघाने मध्यवर्ती कार्यशाळा संघावर मात केली. आज झालेल्या सामन्यात शेख मुकीम, इम्रान पटेल, शेख असीफ, नीरज शिमरे, अनिरुद्ध शास्त्री यांनी आपला विशेष ठसा उमटवला.

 Medical Representative, City Police A Victory | वैद्यकीय प्रतिनिधी, शहर पोलीस अ विजयी

वैद्यकीय प्रतिनिधी, शहर पोलीस अ विजयी

googlenewsNext

औरंगाबाद : एमजीएमवर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस अ संघाने जॉन्सन अँड जॉन्सन संघावर, वैद्यकीय प्रतिनिधी क संघाने युनायटेड संघावर आणि वैद्यकीय ब संघाने मध्यवर्ती कार्यशाळा संघावर मात केली. आज झालेल्या सामन्यात शेख मुकीम, इम्रान पटेल, शेख असीफ, नीरज शिमरे, अनिरुद्ध शास्त्री यांनी आपला विशेष ठसा उमटवला.
पहिल्या सामन्यात शहर पोलीस संघाने ३ बाद १९३ धावा केल्या. त्यांच्याकडून शेख मुकीमने ५३ चेंडूंत एक षटकार व ९ चौकारांसह नाबाद ८३ धावांची वादळी खेळी केली. शेख असीफने एक षटकार व आठ चौकारांसह ५३, सुदर्शन एखंडेने २0 धावा केल्या. जॉन्सन अँड जॉन्सन संघाकडून अनिरुद्ध पुजारी, हर्षद वैद्य व रणजित युके यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात जॉन्सन अँड जॅन्सन संघ ४ बाद १0१ धावाच करू शकला. त्यांच्याकडून हर्षद वैद्यने ३२ व हेमंत मिठावाला व विजय ढेकळे यांनी प्रत्येकी १६ धावा केल्या. शहर पोलीसकडून अनंत गायके, शेख जिलानी, शेख असीफ, शेख मुकीम यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात ‘वैद्यकीय प्रतिनिधी क’ने ६ बाद १६७ धावा केल्या. त्यांच्याकडून इम्रान पटेलने २ षटकार, ५ चौकारांसह नाबाद ५८, अब्दुल वाहीदने एक षटकार व ४ चौकारांसह ३४ व इकबाल खानने ५ चौकारांसह ३0 व अब्दुल कय्युमने २९ धावा केल्या. युनायटेड ब्रेव्हरीजकडून संदीप गायकवाड व संदीप नागरे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. पंकज फलकेने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात युनायटेड ब्रेव्हरीज ६ बाद १६१ करू शकला. त्यांच्याकडून नीरज शिमरे याने ५४ चेंडूंत ३ षटकार व ६ चौकारांसह ७४ धावांची झुंजार खेळी केली. भास्कर जिवरगने एक षटकार व ३ चौकारांसह ४२ व संदीप नागरेने १८ धावा केल्या. वैद्यकीय प्रतिनिधी क संघाकडून अब्दुल वाहीद, वैभव कोलते व जुबेर मुहमी यांनी प्रत्यकी २ गडी बाद केले.
तिसºया सामन्यात वैद्यकीय प्रतिनिधी ब संघाने १९२ धावा केल्या. त्यांच्याकडून अनिरुद्ध शास्त्रीने ४४ चेंडूंत ११ चौकार व एका षटकारासह ७0, संकेत शर्माने २९ व सय्यद फिरदोजने २३ धावा केल्या. मध्यवर्ती कार्यशाळेकडून विकी देशपांडे, रोहिदास गुंजाळ, सोमीनाथ तळेकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात मध्यवर्ती कार्यशाळा संघ १४.४ षटकांत ६९ धावांत गारद झाला. वैद्यकीय प्रतिनिधी ब संघाकडून अनिरुद्ध शास्त्रीने ६ धावांत ३ गडी बाद केले. सय्यद फिरदोस व राहुल भालेराव यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

Web Title:  Medical Representative, City Police A Victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :