खाजगी रुग्णालयांतील वैद्यकीय सेवा २४ तास बंद, 'आयएमए'ने पुकारला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:49 PM2019-06-17T12:49:57+5:302019-06-17T12:52:09+5:30
बहुतेक रुग्णालयांबाहेरच ‘ओपीडी बंद’चा बोर्ड लावण्यात आला आहे.
औरंगाबाद :शहरात 'आयएमए'ने आज पुकारलेल्या बंदमध्ये शहरातील लहान-मोठ्या रुग्णालयातील डॉक्टर सहभागी झाल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. या खासगी रुग्णालयांचे बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद ठेवण्यात आली आहेत. कोलकाता येथे डॉक्टरांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी (दि.१७) शहरातील खाजगी वैद्यकीय सेवा २४ तासासाठी बंद असणार आहे.
देशभरातील सर्व रुग्णालये सोमवारी सकाळी ६ ते मंगळवार सकाळी ६ या २४ तासासाठी बंद असतील. सकाळी ९ वाजता शहरातील 'आयएमए'चे सर्व सभासद समर्थनगर येथील आयएमए हॉल येथे एकत्र आली. यानंतर कोलकाता येथील घटनेचा निषेध करण्यात आला. ‘आयएमए’च्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील बहुतांश खासगी डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयांतीळ डॉक्टर सहभागी झाले आहे. डॉ. हेडगेवार रुग्णालय, कमलनयन बजाज रुग्णालय, सेठ नंदलाल धूत रुग्णालय, एमजीएम हॉस्पिटल या मोठय़ा रुग्णालयांसह अनेक रुग्णालयांतील तसेच दवाखान्यांतील ओपीडी दिवसभर बंद आहे, अशी माहिती 'आयएमए' चे सचिव डॉ. यशवंत गाडे यांनी सांगितले. बहुतेक रुग्णालयांबाहेरच ‘ओपीडी बंद’चा बोर्ड लावण्यात आला आहे.
यावेळी डॉ.अनुपम टाकळकर, डॉ.संतोष रंजलकर, डॉ. कुलदीपसिंग राऊळ, डॉ.रमेश रोहिवाल, डॉ.संतोष रंजलकर, डॉ.मंजुषा शेरकर, डॉ.हेमंत फटाले, डॉ.प्रीती फटाले, डॉ. अपर्णा राऊळ,डॉ .अजय रोटे आदी उपस्थित होते