रेणुका देवी कारखान्याच्या विस्तारासाठी मुंबईत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:07 AM2021-02-05T04:07:35+5:302021-02-05T04:07:35+5:30
खासदार पवार यांच्या हस्ते या कारखान्याचे उद्घाटन वीस वर्षांपूर्वी झाले होते. बराच कालावधी कारखाना बंद होता. चार वर्षांपूर्वी ...
खासदार पवार यांच्या हस्ते या कारखान्याचे उद्घाटन वीस वर्षांपूर्वी झाले होते. बराच कालावधी कारखाना बंद होता. चार वर्षांपूर्वी भुमरे यांनी कारखान्याची निवडणूक लढवून तो आपल्या ताब्यात घेतला. पैठण तालुक्यातील उसाचे वाढते क्षेत्र लक्षात घेता कारखान्याचा विस्तार वाढ करणे गरजेचे असल्याचे लक्षात घेत चेअरमन तथा मंत्री भुमरे यांनी सातत्याने पवार यांच्याकडे कारखान्याच्या प्रश्नावर भेट घेत अडचणी मांडल्या आहेत. त्याअनुषंगाने खासदार पवार यांनी मंत्री भुमरे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड, एम.एस.सी. बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक घेत विविध विषयांवर चर्चा केली. यात भुमरे म्हणाले की, आजपर्यंत कारखान्याने एक लाख एक हजार टन उसाचे गाळप केले असून, पैठण तालुक्यातील उसाचे क्षेत्र वाढत असल्याने कारखान्याच्या विस्ताराची मागणी बैठकीत केली. यावेळी शरद पवारांनी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. बैठकीला कार्यकारी संचालक नामदेव बावडकर, जनरल मॅनेजर राजेंद्र काळे, विशेष लेखापरीक्षक आर. एस. शेख, विष्णुदास तारे, अंकुश भूमरे-पाटील, पुरुषोत्तम जाधव, आदी उपस्थित होते.
--- पाचोड : मुंबईत खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस मंत्री संदीपान भुमरे, आदी उपस्थित होते.