खुलताबाद तालुक्यात नवनिर्वाचित सरपंचांची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:05 AM2021-02-24T04:05:47+5:302021-02-24T04:05:47+5:30
खुलताबाद पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील सरपंचांची तालुकास्तरीय सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी गणेश आधाने होते. व्यासपीठावर पं. ...
खुलताबाद पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील सरपंचांची तालुकास्तरीय सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी गणेश आधाने होते. व्यासपीठावर पं. स. सदस्य प्रभाकर शिंदे, विस्तार अधिकारी एच. बी. कहाटे, राजेंद्र दांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. नवनिर्वाचित सरपंचांना मार्गदर्शन करताना उपसभापती रेखा चव्हाण यांनी, महिलांना पन्नास टक्के आरक्षण असल्याने राजकारणात चांगले काम करून दाखविण्यासाठी मोठी संधी आहे. गावच्या विकासासाठी नवनवीन योजना राबविण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन एच. बी. कहाटे यांनी केले. आभार राजेंद्र दांडेकर यांनी मानले.
यावेळी खिर्डीचे सरपंच ज्ञानेश्वर मातकर, झरीचे करणसिंग चंदवाडे, बोडखाचे अशोक जाधव, भडजीचे बाबासाहेब वाकळे, मावसाळा राजेश्री देवगिरीकर, वेरूळच्या कुसुम मिसाळ, कागजीपुरा येथील शेख अहेमद आदी सरपंचांची उपस्थिती होती.
फोटो कँप्शन : खुलताबाद पंचायत समितीच्या वतीने आयोजित सभेत नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार करताना उपसभापती रेखा चव्हाण. समवेत सभापती गणेश आधाने, सदस्य प्रभाकर शिंदे, एच.बी. कहाटे.