अवैध वाळू उपशाबाबत दक्षता समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:04 AM2021-02-26T04:04:37+5:302021-02-26T04:04:37+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार अवैध गौण खनिज उत्खनन व तस्करीला प्रतिबंध करण्यासाठी गावोगावी ग्रामदक्षता समित्यांची स्थापन करण्यात आली आहे. दिगाव ...
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार अवैध गौण खनिज उत्खनन व तस्करीला प्रतिबंध करण्यासाठी गावोगावी ग्रामदक्षता समित्यांची स्थापन करण्यात आली आहे. दिगाव येथे नुकतीच या समितीची बैठक पार पडली. गावाजवळून वाहणाऱ्या पूर्णा नदी पात्रातून वाढलेल्या अवैध वाळू उपशाला चाप लावण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. परिसरातील कोणत्याही वाळूपट्ट्यांचा लिलाव झालेला नसताना चालणारी वाळू वाहतूक सध्या कळीचा मुद्दा बनली आहे. याच अनुषंगाने नदीपात्रात रात्रीची पोलीस गस्त वाढविणे, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे व लवकरात लवकर वाळूघाटांचा लिलाव करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सरपंच कस्तुराबाई सुसुंद्रे, राजू तुपे, प्रभाकर दहीहंडे, तलाठी नारायण पठ्ठे, अस्लम शेख, माधवराव गायकवाड, दशरथ खेळवणे आदी नागरिक उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : दिगाव येथे ग्रामदक्षता समितीची बैठक पार पडली.
250221\vijay thorat_img-20210225-wa0009_1.jpg
दिगाव येथे ग्रामदक्षता समितीची बैठक पार पडली.