‘समांतर’साठी आता शुक्रवारी सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:06 AM2018-08-13T01:06:28+5:302018-08-13T01:06:57+5:30
समांतर’ जलवाहिनीसाठी शनिवारी महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत आयुक्त डॉ. निपुण विनायक गैरहजर असल्याने पुढील सभा १७ आॅगस्ट शुक्रवार रोजी घेण्याचे घोषित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘समांतर’ जलवाहिनीसाठी शनिवारी महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत आयुक्त डॉ. निपुण विनायक गैरहजर असल्याने पुढील सभा १७ आॅगस्ट शुक्रवार रोजी घेण्याचे घोषित करण्यात आले. मागील तीन सर्वसाधारण सभांमध्ये हा विषय टोलविण्यात येत आहे, हे विशेष.
शहरातील १५ लाख नागरिकांची तहान भागविण्यासाठी मागील आठ वर्षांपासून महापालिकेत ‘समांतर’चे गुºहाळ सुरू आहे. समांतरचे काम अर्धवट सोडलेल्या कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन प्रकरण न्यायप्रविष्ट केले आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसारच मनपा आयुक्तांनी सर्वसाधारण सभेसमोर कंपनीला पुन्हा कामावर ठेवावे किंवा नाही याचा निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे. मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे यांनी आत्महत्या केल्याने सभा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर ६ आॅगस्ट रोजी मनपा पदाधिकाऱ्यांनी समांतरवर चर्चा करण्यास टाळाटाळ केली.
आता तिस-यांंदा जेव्हा सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली तेव्हा मनपा आयुक्त गैरहजर होते. महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवार, दि.१७ आॅगस्ट रोजी समांतरसाठी विशेष सभा आयोजित केल्याचे घोषित केले.