मेगा ब्लाॅक! मनमाड-अंकाई किल्ल्यादरम्यान दुहेरीकरणासाठी १५ रेल्वे रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 08:01 PM2022-06-23T20:01:41+5:302022-06-23T20:02:03+5:30
१० रेल्वे अंशत: रद्द, २ रेल्वे धावणार मार्ग बदलून
औरंगाबाद : मध्य रेल्वेकडून मनमाड ते अंकाई किल्ल्यादरम्यान दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे पूर्ण करण्यासाठी मेगा ब्लाॅक घेण्यात आला असून, १५ रेल्वे गाड्या २३ ते २९ जूनदरम्यान रद्द करण्यात आलेल्या आहेत. काही रेल्वे उशिरा तर काही मार्ग बदलून धावतील.
दुहेरीकरणाच्या कामासाठी यार्ड रि-मोडलिंग आणि इतर संबंधित कामे करण्यासाठी मेगा ब्लाॅक घेण्यात आला आहे. १५ रेल्वे पूर्णत: रद्द आहेत. तर १० रेल्वे अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. या रेल्वे रोटेगाव-मनमाड-रोटेगाव, नगरसोल-शिर्डी-नगरसोल आणि नगरसोल-मनमाड-नगरसोलदरम्यान रद्द आहेत. २ रेल्वे मार्ग बदलून धावतील. यात नांदेड-निझामुद्दीन ही रेल्वे २८ जून रोजी नांदेड-औरंगाबाद-मनमाडऐवजी पूर्ण-हिंगोली-अकोला- भुसावळ अशी धावेल. तर निझामुद्दीन-नांदेड रेल्वे २९ जून रोजी औरंगाबाद-जालना-परभणी हा मार्ग वगळून धावेल.
या दिवशी या रेल्वे रद्द
- २३ जून रोजी विशाखापट्टणम् – श्री साईनगर शिर्डी रेल्वे.
-२४ जून रोजी श्री साईनगर शिर्डी – विशाखापट्टणम् रेल्वे.
- २५ ते २८ जूनदरम्यान सी.एस.टी. मुंबई - जालना जनशताब्दी एक्स्प्रेस.
- २६ ते २९ जूनदरम्यान जालना - सी.एस.टी. मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस.
- २७ व २८ जून रोजी सी.एस.टी. मुंबई - आदिलाबाद नंदीग्राम एक्स्प्रेस.
- २६ व २७ जून रोजी आदिलाबाद - सी.एस.टी. मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस.
- २७ व २८ जून रोजी जालना - श्री साईनगर शिर्डी रेल्वे
- २७ व २८ जून रोजी श्री साईनगर शिर्डी – जालना रेल्वे.
- २४ व २६ जून रोजी जालना - नगरसोल रेल्वे.
- २४ व २६ जून रोजी नगरसोल – जालना रेल्वे.