आजपासून मेगा शटडाऊन

By Admin | Published: September 15, 2014 12:40 AM2014-09-15T00:40:43+5:302014-09-15T00:41:51+5:30

औरंगाबाद : शहराला १५ सप्टेंबरपासून निर्जळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे

Mega shutdown today | आजपासून मेगा शटडाऊन

आजपासून मेगा शटडाऊन

googlenewsNext

औरंगाबाद : शहराला १५ सप्टेंबरपासून निर्जळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पितृपक्षातच पालिकेमुळे नागरिकांना पाणी-पाणी करावे लागणार आहे. प्रसिद्धीपत्रकात एक दिवस पाणीपुरवठा होणार नाही, असे जाहीर करण्यात आले असले तरी आठवडाभर पाणीपुरवठा कोलमडणार आहे.
पालिकेने आणि औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन मुख्य जलवाहिन्यांच्या गळत्यांची डागडुजी करण्यासाठी १५ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे.
जायकवाडी ते नक्षत्रवाडी एमबीआरपर्यंत पाणीपुरवठा करणाऱ्या ७००, १२००, १४०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिन्यांची निर्वहन क्षमता संपल्याने त्यांची चाळणी झालेली आहे. त्यामुळे त्यांना वारंवार गळती लागत आहे. जलवाहिन्यांना लागलेल्या गळतीमुळे सध्या रोज १० एमएलडी (१ कोटी लिटर) पाणी वाया जात आहे. सिडको- हडकोसह शहरात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. जलवाहिन्यांना गळती लागलेली आहे. त्यांची डागडुजी करणे महत्त्वाचे आहे.

Web Title: Mega shutdown today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.