औरंगाबादेत ‘जैनम’ सदस्यांनी अनुभवला लावणी धमाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:10 AM2018-01-30T00:10:12+5:302018-01-30T00:10:18+5:30
ढोलकीचा आवाज घुमू लागताच प्रत्येक मराठी मन ताल धरू लागते आणि लावणी गुणगुणू लागते. याचा अनुभव जैनम महिला मंचच्या सदस्यांनी नुकताच घेतला. सोमवारी (दि.२९) सायंकाळी तापडिया नाट्यमंदिर येथे जैनम मंचतर्फे लावणीच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ढोलकीचा आवाज घुमू लागताच प्रत्येक मराठी मन ताल धरू लागते आणि लावणी गुणगुणू लागते. याचा अनुभव जैनम महिला मंचच्या सदस्यांनी नुकताच घेतला. सोमवारी (दि.२९) सायंकाळी तापडिया नाट्यमंदिर येथे जैनम मंचतर्फे लावणीच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये ‘नटरंगी नार’ सुरेखा पुणेकर आणि त्यांच्या सहकाºयांनी एकापेक्षा एक सुंदर लावण्या सादर करून महिलांचे मनोरंजन केले. ‘पाडाला पिकलाय आंबा..’, ‘आला आला गोविंदा आला..’, ‘पिकल्या पानाचा रंग...’, ‘ढोलकीच्या तालावर..’ या सारख्या लोकप्रिय लावण्यांनी महिलांची वाहवा मिळविली.
स्नेहा गादिया, सुनीता देसरडा यांची प्रमुख उपस्थिती होती. भारती बागरेचा, मंचच्या अध्यक्षा वर्षा साहुजी, माजी अध्यक्षा भावना सेठिया, निर्मला मुथा, कविता अजमेरा, सचिव मंगला गोसावी, करुणा साहुजी, कमला ओस्तवाल, पुष्पा बाफना, मंदा गोसावी, मंजू पाटणी, मीना पापडीवाल, नीता गादिया यांच्यासह रेखा राठी, अनुपमा दगडा, मनीषा पाटणी यांची विशेष उपस्थिती होती. रुचिका जैन यांच्या मंगलाचरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंदा मुथा यांनी संचालन केले. विद्या खिंवसरा यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. ललिता करवा यांनी आभार मानले. दिव्य गोला यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य के ले.