आठवणीतून अनिल पैठणकर यांचे स्मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:04 AM2021-01-13T04:04:26+5:302021-01-13T04:04:26+5:30
औरंगाबाद : ब्राह्मण समाजातील ३६ संघटनांना एकत्र करून भगवान परशुरामाच्या जयंतीला भव्य स्वरूप प्राप्त करून देणारे कै. अनिल पैठणकर ...
औरंगाबाद : ब्राह्मण समाजातील ३६ संघटनांना एकत्र करून भगवान परशुरामाच्या जयंतीला भव्य स्वरूप प्राप्त करून देणारे कै. अनिल पैठणकर यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींचे स्मरण सर्वांनी केले. ‘ब्राह्मण संघटनेतील संत हरपला,’ अशी शब्दांत त्यांच्या समाजकार्याची माहिती सर्वांनी विशद करण्यात आली.
ब्राह्मण समाज समन्वय समितीचे अध्यक्ष अनिल पैठणकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्त रविवारी सायंकाळी शास्त्रीनगर येथील सभागृहात शोकसभेचे आयोजन केले होते. पैठणकर यांनी नि:स्वार्थ वृत्तीने ब्राह्मण समाजाची सेवा केली. समाजात कार्यरत ३६ संघटनांना एकत्र करून भगवान परशुराम जयंतीनिमित्त त्यांनी भव्य शोभायात्रा सुरू केली. दिवाळी स्नेहमिलन घडवून आणले. संघटनकौशल्य असणारे हे व्यक्तिमत्त्व, आपल्या शांतवृत्तीने ब्राह्मणच नव्हे तर अन्य समाजांतही त्यांनी तेवढाच आधार निर्माण केला होता. समजातील सर्व संघटनांनी एकत्र राहून सामाजिक व धार्मिक कार्य करावे, हीच पैठणकर यांना श्रद्धांजली होऊ शकेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
यावेळी आमदार अतुल सावे, आमदार अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडले तसेच शिरीष बोराळकर, सुहास दशरथे, बंडू ओक यांनी श्रद्धांजली वाहिली. आनंद तांदूळवाडीकर, अनिल मुळे, सुधीर नाईक, सी. एम. शर्मा, सीए आर. बी. शर्मा, मिलिंद दामोदर, जगदीश हर्सूलकर, मनीषा देशपांडे, आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सुरेश देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. आशिष सूरडकर व अभिषेक कादी यांनी सूत्रसंचालन केले. जीवनगुरू जोशी यांनी शांतीपाठ म्हटला. यावेळी विविध राजकीय पक्षांतील माजी नगरसेवक, ब्राह्मण समाजातील पदाधिकारी, अन्य समाजांतील पदाधिकारी हजर होते.