पुरुषांना नसबंदीची भीती, ९ महिन्यांत केवळ ४ जणांचीच शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 12:02 PM2021-02-08T12:02:53+5:302021-02-08T12:04:32+5:30

जिल्ह्यातील गेल्या पावणेदोन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यावर कुटुंब नियोजन व नसबंदी शस्त्रक्रियांना मिळणारा प्रतिसाद चिंताजनक आहे.

Men fear sterilization, only 4 surgeries in 9 months | पुरुषांना नसबंदीची भीती, ९ महिन्यांत केवळ ४ जणांचीच शस्त्रक्रिया

पुरुषांना नसबंदीची भीती, ९ महिन्यांत केवळ ४ जणांचीच शस्त्रक्रिया

googlenewsNext
ठळक मुद्देअनेक गैरसमज असल्याने पुरुषांतून उदासीनता, उद्दिष्टपूर्ती होईना

औरंगाबाद : पुरुष नसबंदी शस्त्रक्रियांबद्दलचे अनेक गैरसमज असल्याने पुरुषांत उदासीनता दिसून येत आहे. गेल्या ९ महिन्यांत महिलांनी कुटुंब नियोजनाच्या २,०३४ शस्त्रक्रिया केल्या, तर केवळ चार पुरुषांनी नसबंदी करून घेतली आहे. अवघ्या काही मिनिटांत होणाऱ्या या शस्त्रक्रिया पुरुषांनीही करणे महिलांपेक्षा सोइस्कर असताना, नसबंदी केवळ महिलांनी करावी, असाच अलिखित नियम झाल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.

जिल्ह्यातील गेल्या पावणेदोन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यावर कुटुंब नियोजन व नसबंदी शस्त्रक्रियांना मिळणारा प्रतिसाद चिंताजनक आहे. गेल्या नऊ महिन्यांत नसबंदी शस्त्रक्रिया उद्दिष्टाच्या केवळ ११ टक्के झाल्या. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून ३ तर जिल्हा शल्यचिकित्सकांनी ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून १ पुरुष नसबंदी करण्यात आली. विशेष म्हणजे, मनपा हद्दीत एकही पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया झाली नाही. मात्र, शहरात महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांची आकडेवारी अधिक दिसते. बाळंतपण, बालकांचे संगोपण, घरकाम सर्वच महिला करत असताना पुरुषांनी किमान नसबंदीत तरी पुढाकार घ्यावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

काय आहेत गैरसमज...
पुरुषाने कुटुंब करावे, म्हणून विविध माध्यमांतून शासनाकडून, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृती करण्यता येते. पुरुषांच्या नसबंदी शस्त्रक्रियेला अनुदानही प्रोत्साहनासाठी दिले जाते. मात्र, या शस्त्रक्रियेने नपुंसकता येते, जड काम करता येत नाही, असे अनेक गैरसमज असल्याने पुरुष या शस्त्रक्रियेसाठी समोर येत नाहीत. महिलाही पुरुषांना आडकाठी घालतात, अशी कारणे सांगितली जात असली, तरी यामागे पुरुषी मानसिकतेचेही कारण आहे.

महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना घरातील सर्व कामे त्याच करतात. त्यामुळे नसबंदीत तरी पुरुषांनी पुढाकार घेतला पाहिजे. कुटुंब नियोजन कुटुंब कल्याणाचा मार्ग आहे.
- अमोल निकम, आमखेडा

आदिवासी भागात मातृसत्ताक पद्धती आहे. तिथे पुरुष नसबंदीचे प्रमाण अधिक दिसते. मात्र, आपल्याकडे असलेल्या पुरुष मानसिकतेत महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. आज पुरुषांनी यात पुढाकार घेण्याची गरज आहे. गैरसमज दूर व्हावेत.
- समाधान पंडित, औरंगाबाद

प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न 
पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित आहे. माझ्यासह २४ अधिकाऱ्यांनीही शस्त्रक्रिया उदगीरमध्ये करून, आम्ही लातूरला अभियान राबविले होते. त्याला प्रतिसादही मिळाला होता. त्याच धर्तीवर हेल्थ वर्करमधून जिल्ह्यात एक हजार शस्त्रक्रियातून आधी केले आणि मग सांगितले, या उक्तीने व्यापक जनजागृतीचा प्रयत्न होता. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद नाही. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गावोगावी विविध कल्पक पद्धतीने जनजागृती केली. पुरुष नसबंदीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
- डाॅ.सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी, औरंगाबाद

एक नजर...शस्त्रक्रियांवर
वर्ष २०१९

११,०९५ एकूण शस्त्रक्रिया
११,०६९ महिलांनी केलेल्या शस्त्रक्रिया
२६ पुरुष नसबंदी

वर्ष २०२०
२,०३८ एकूण शस्त्रक्रिया
२,०३४ महिलांनी केलेल्या शस्त्रक्रिया
४ पुरुष नसबंदी

Web Title: Men fear sterilization, only 4 surgeries in 9 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.