वार्धक्यशास्त्र विभागात डाॅक्टरांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:04 AM2021-04-29T04:04:06+5:302021-04-29T04:04:06+5:30
चोऱ्या पकडण्यापेक्षा, त्या कशा टाळता येतील, यासंबंधी व्ही. व्ही. जाधव यांनी मार्गदर्शन केले. वाहनाला चावी ठेवून वॉर्ड किंवा वसतिगृहात ...
चोऱ्या पकडण्यापेक्षा, त्या कशा टाळता येतील, यासंबंधी व्ही. व्ही. जाधव यांनी मार्गदर्शन केले. वाहनाला चावी ठेवून वॉर्ड किंवा वसतिगृहात जाणे, टेबलवर पर्स, पाकीट, मोबाईल ठेवणे यामुळे चोरीची शक्यता वाढते. त्यामुळे हे प्रकार टाळावे. घाटी परिसरात पथदिवे बसविण्यात आलेले आहेत. चार कर्मचारी पेट्रोलिंगसाठी दिल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत वाढ झाली आहे. नातेवाईकांकडून काही त्रास झाला तर वेळीच मदत मिळेत, असे ते म्हणाले. या बैठकीस वार्धक्यशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डाॅ. मंगला बाेरकर, सहयोगी प्राध्यापक डाॅ. शैलजा राव, सहायक प्राध्यापक डाॅ. गणेश सोनवणे, वरिष्ठ निवासी डाॅक्टर ऋषिकेश फुसे, निवासी डाॅक्टर महेश पाटील, डाॅ. झेबा फिरदोस, डाॅ. आशिष राजन, डाॅ. श्रृती कर्णिक, डाॅ. साधना जायभाये, डाॅ. पंकज महाजन, डाॅ. केहकशन , डाॅ. मिलिंद, डाॅ. आयेशा, डाॅ. दीपक उपस्थित होते.
फोटो ओळ....
घाटीतील वार्धक्यशास्त्र विभागात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना व्ही. व्ही. जाधव. यावेळी उपस्थित डाॅक्टर.