मुंबई, दिल्लीतील व्यापाऱ्यांकडून शेतक-यांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 05:33 AM2018-12-08T05:33:21+5:302018-12-08T05:33:28+5:30
मुंबई व दिल्लीतील काही व्यापा-यांनी वर्षभरापूर्वी तालुक्यातील दुधड, सय्यदपूर आदी गावांतील अनेक शेतक-यांना डाळिंब खरेदीत कोट्यवधी रुपयांना गंडवल्याचे उजेडात आले आहे.
औरंगाबाद : मुंबई व दिल्लीतील काही व्यापा-यांनी वर्षभरापूर्वी तालुक्यातील दुधड, सय्यदपूर आदी गावांतील अनेक शेतक-यांना डाळिंब खरेदीत कोट्यवधी रुपयांना गंडवल्याचे उजेडात आले आहे.
दिल्ली येथील व्यापारी रामचंद्र तिलकधारी यांची फर्म दिल्लीच्या आझादपूर भागात आहे. गेल्या वर्षी व्यापारी रामचंद्र हा दुधड येथे डाळिंब खरेदीसाठी आला. त्याने येथील एका शेतकºयाचे डाळिंब खरेदी करून रोख पैसे दिले. तसेच मुंबईतील अन्य काही व्यापाºयांनीही रोख व्यवहार करून विश्वास संपादन केला. नंतर बºयाच शेतकºयांकडून उधारीवर खरेदी करून डाळिंब दिल्ली व मुंबईला पाठविले. पैसे एका आठवड्यात तुमच्या बँकेच्या खात्यात टाकतो, असे सांगून व्यापाºयांनी मुंबई व दिल्लीला पलायन केले आणि शेतकºयांचे पैसे बुडविले.