आठवडाभर पारा ४० अंशांच्या पुढेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 11:26 PM2019-05-18T23:26:48+5:302019-05-18T23:27:03+5:30

मागील एक आठवड्यापासून शहरातील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढेच असून, घाम काढणाऱ्या उन्हामुळे शहरवासीय हैराण झाले आहेत.

Mercury is more than 40 degrees ahead of the week | आठवडाभर पारा ४० अंशांच्या पुढेच

आठवडाभर पारा ४० अंशांच्या पुढेच

googlenewsNext

औरंगाबाद : मागील एक आठवड्यापासून शहरातील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढेच असून, घाम काढणाऱ्या उन्हामुळे शहरवासीय हैराण झाले आहेत.


रविवार दि. १२ मेपासून ते शनिवारपर्यंत सूर्र्य आग ओकत आहे. या काळात कमाल ४०.२ ते ४०.४ अंशांच्या दरम्यान राहिले आहे. जिल्ह्यात सर्वत्रच उन्हाचा चटका बसत आहे. दोन दिवासांपूर्वी पैठण तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची घटना घडली आहे.


औरंगाबाद शहरात उकाड्यामुळे अनेक घरांमध्ये दिवसरात्र कूलर आणि एसी चालू असल्याचे चित्र आहे. दुपारच्या वेळी वाहतूक मंदावल्याचे चित्र आठवडाभरापासून आहे. रसवंत्या तसेच आईस्क्रीम पार्लरमध्ये गर्दी दिसत आहे.
शनिवारी सकाळपासूनच सूर्य आग ओकू लागल्याने घराबाहेर पडणाऱ्यांनी डोळ्यावर काळे गॉगल्स, डोक्यावर पांढरे रूमाल किंवा हेल्मेट, हातात मोजे, चेहºयावर स्कॉर्प, रूमाल बांधलेले दिसत होते.

रविवारपासून हेच चित्र पाहण्यास मिळत आहे. आठवडाभर तापमानात कोणतीही घसरण न होता तापमान ४० अंशांच्या पुढेच राहिले आहे.
दरम्यान, महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, विनाकारण उन्हात जाणे टाळा, असा सल्लादेखील वैद्यकीय अधिकारी देताना दिसत आहेत. 

Web Title: Mercury is more than 40 degrees ahead of the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.