जीएसटीएन नेटवर्कचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:36 AM2017-08-31T00:36:51+5:302017-08-31T00:36:51+5:30

जीएसटीएन नेटवर्कमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने पहिले विवरणपत्र दाखल न करूशकलेल्या सुमारे ४० टक्के करदात्यांना दररोज २०० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे

The mess of GSTN network | जीएसटीएन नेटवर्कचा गोंधळ

जीएसटीएन नेटवर्कचा गोंधळ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जीएसटीएन नेटवर्कमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने पहिले विवरणपत्र दाखल न करूशकलेल्या सुमारे ४० टक्के करदात्यांना दररोज २०० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. महिना संपत आला; पण अजूनही तांत्रिक अडचणी दूर करण्यात जीएसटीएन नेटवर्कला यश आले नाही. हे सरकारचे अपयश असूनही भुर्दंड करदात्यांना भरावे लागत असल्याने चार्टर्ड अकाऊंटंट, करदात्यांमध्ये संताप पसरला आहे.
वस्तू व सेवा कर (जीएसटी) चे जुलै महिन्याचे पहिले विवरणपत्र आॅनलाइन भरण्याची २० आॅगस्ट अखेरची तारीख होती. मात्र, देशभरातून विवरणपत्र दाखल करण्याचा ओघ वाढल्याने जीएसटीएनच्या वेबसाइटवर मोठा ताण पडला व साइट वारंवार हँग होत राहिली. यामुळे लाखो करदात्यांना आॅनलाइन विवरणपत्र भरता आले नाही. अर्थमंत्रालयाने ही बाब लक्षात घेऊन विवरणपत्र भरण्याची मुदत आणखी ५ दिवस वाढवून २५ आॅगस्ट करण्यात आली व ज्यांना जुन्या स्टॉकवर इनपूट टॅक्स क्रेडिट घ्यायचे होते त्यांच्यासाठी विवरण भरण्याची २८ आॅगस्ट शेवटची तारीख होती. मुदत वाढवूनही बेवसाइटमधील तांत्रिक दोष दूर करता आले नाही. अजूनही जीएसटीएन नेटवर्कने गती पकडली नाही. ‘पहिले पाढे पंचावन’ अशीच परिस्थिती आहे. अर्थमंत्रालयाने जाहीर केल्याप्रमाणे अजूनही ४० टक्के करदात्यांना आॅनलाइन विवरणपत्र दाखल करता आले नाही. जुलै २०१७ पासून बाह्य आपूर्ती विवरणपत्र जमा करण्याची सुविधा १५ जुलै २०१७ पासून उपलब्ध करून देण्यात आली.

Web Title: The mess of GSTN network

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.