‘मेटलमॅन’च्या कामगारांना भरघोस वेतनवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 07:29 PM2018-12-13T19:29:10+5:302018-12-13T19:29:25+5:30

वाळूज एमआयडीसीतील मेटलमॅन कंपनीच्या कामगारांना भरघोस वेतनवाढ करण्यात आल्यामुळे कामगारात आनंदाचे वातावरण पसरले आहे

 'Metalman' workers get huge pay raise | ‘मेटलमॅन’च्या कामगारांना भरघोस वेतनवाढ

‘मेटलमॅन’च्या कामगारांना भरघोस वेतनवाढ

googlenewsNext

वाळूज महानगर: वाळूज एमआयडीसीतील मेटलमॅन कंपनीच्या कामगारांना भरघोस वेतनवाढ करण्यात आल्यामुळे कामगारात आनंदाचे वातावरण पसरले आहे. नवीन करारानुसार कामगारांच्या वेतनात ९ हजार १०० रुपयांची वाढ झाली आहे.


या कंपनीत दुचाकीसाठी लागणाऱ्या चेसिजचे उत्पादन करण्यात येत असून बजाज आॅटो कंपनीला याचा पुरवठा करण्यात येतो. या कंपनीत भारतीय कामगार सेनेचे युनियन असून, नवीन वेतनवाढीचा करार करात यावा, यासाठी भाकासेचे मराठवाडा विभागीत चिटणीस प्रभाकर पा.मते यांनी कंपनी व्यवस्थापनाकडे पाठपुरावा केला होता.

या कराराविषयी युनियन व कंपनी व्यवस्थापनात चार महिन्यांपासून बैठका सुरु होत्या. कंपनी व्यवस्थापनाने युनियनच्या पदाधिकाºयांची चर्चा करुन सहावा वेतनवाढीचा करार केला. या करारानुसार कामगारांच्या वेतनात ९ हजार १०० रुपयांची वाढ झाली आहे. याचबरोबर कामगारांच्या एका मुलीच्या लग्नासाठी ६६ हजार ५०० रुपये दिले जाणार असून, बोनसची मर्यादा १८ हजार ३०० रुपये व बेव्हलेंट फंडची मर्यादा ४ लाखांवरुन ५ लाखापर्यंत करण्यात आली आहे. कंपनीत काम करणाºया प्रत्येक कामगारांना वाढदिवसांच्या दिवशी पगारी सुट्टी दिली जाणार आहे.

दहावी व बारावी परिक्षेत गुणवत्ता यादीत येणाºया कामगार पाल्यांना २५ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. याप्रसंगी कंपनीचे संचालक निशांत जयरथ, सीईओ श्रीकांत मुंदडा, विभागीय चिटणीस प्रभाकर पा.मते, जनरल मॅनेजर अनिल डहाळे, प्रकाश एखंडे, कृष्णकांत बिजमवार, संघटनेचे सहचिटणीस कोमलिंग इंगळे, शिवाजी तुरटवाड, युनिट अध्यक्ष कल्याण पिनप्रीतवार, उपाध्यक्ष ठगनाजी दुगने, सचिव श्रीनिवास सुग्रे, विजय साळुंके, मकसुद शहा, भागचंद्र भालेकर आदी उपस्थित होते.

Web Title:  'Metalman' workers get huge pay raise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.