वाळूज महानगरात अतिक्रमणाला अभय;झाडांचा मात्र सर्रास बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 06:55 PM2018-07-02T18:55:57+5:302018-07-02T18:56:55+5:30

बजाजनगरात एमआयडीसी अधिकाऱ्यांकडून विकास कामांत अडथळा ठरणाऱ्या धनदांडग्यांच्या अतिक्र्रमणाला अभय दिले जात आहे.

In the metropolis of Walaj, the aboriginal encroachment; | वाळूज महानगरात अतिक्रमणाला अभय;झाडांचा मात्र सर्रास बळी

वाळूज महानगरात अतिक्रमणाला अभय;झाडांचा मात्र सर्रास बळी

googlenewsNext

वाळूज महानगर (औरंगाबाद ) : बजाजनगरात एमआयडीसी अधिकाऱ्यांकडून विकास कामांत अडथळा ठरणाऱ्या धनदांडग्यांच्या अतिक्र्रमणाला अभय दिले जात आहे. दुसरीकडे मात्र विकास कामांच्या नावाखाली विनापरवाना झाडांचा बळी घेतला जात आहे. याकडे वनविभाग प्रशासनही डोळेझाक करीत आहे. 

बजाजनगरमध्ये रस्ता रुंदीकरण, ड्रेनेजलाईन आदी विकासकामे सुरू आहेत. एमआयडीसीकडून यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत.  रामलीला मैदान ते मोहटादेवी मंदिर रस्तावगळता बहुतांशी सर्वच मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करून डांबरीकरण केले जात आहे. एमआयडीसीने रस्त्यावर आलेल्या मालमत्तांना मार्किंग करून संबंधित मालमत्ताधारकांना त्या काढून घेण्यास सांगितले होते. अनेक मालमत्ताधारकांनी रस्त्यावर आलेले बांधकाम स्वत: काढले. अडथळा ठरणारी बांधकामे काढण्यासाठी एमआयडीसीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली; मात्र हितसंबंधी व्यक्तीचे अतिक्रमण न पाडता नुसता कारवाईचा देखावा करून त्या अतिक्रमणाला अभय दिले; मात्र विकास कामांत अडथळा ठरत नसतानाही दोन जुन्या झाडांचा बळी घेतला.

बजाजनगरात एमआयडीसीच्या अनेक मोकळ्या भूखंडांवर अनेक धनदांडग्यांनी अतिक्रमण करून कोट्यवधी रुपयांच्या जागा बळकावल्या आहेत. हरितपट्टा तर नुसता कागदावरच शिल्लक आहे. नागरी वसाहत भागातही नागरिकांनी एमआयडीसीच्या जागेत बांधकाम के ले आहे. मोरे चौक, महाराणा प्रताप चौक, लोकमान्य चौक, कोलगेट चौक परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यावर बांधकाम केले गेले आहे. प्रताप चौकातील काही व्यावसायिकांनी तर अतिक्रमण करून अंतर्गत रस्तेच बंद केले आहेत. हे अतिक्रमण रस्ता रुंदीकरण कामात अडथळा ठरत असल्याने नागरिकांकडून येथील अतिक्रमण हटविण्याची अनेकदा मागणी केली आहे. 

एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दोन दिवसांत त्याची पाहणी करून विकास कामांत अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई केली जाईल, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. वनरक्षक मनोज कांबळे म्हणाले, झाडे तोडल्याप्रकरणी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसीच्या हद्दीत धोकादायक झाडे असल्यास ती तोडण्याचा त्यांना अधिकार आहे.

व्यावसायिकांना फायद्यासाठी सर्वकाही
रस्ता रुंदीकरणात अडथळा नसतानाही एमआयडीसी अधिकाऱ्यांकडून व्यावसायिकांच्या फायद्यासाठी मोठमोठी झाडे धोकादायक ठरवून कत्तल केली जात आहे. पर्यावरण संवर्धनासाठी एकीकडे शासनासह विविध सेवाभावी, सामाजिक संघटना मोठ्या प्रमाणात झाडे लावून संगोपन करीत आहेत, तर दुसरीकडे शासकीय अधिकारी उभ्या झाडावरच कुºहाड चालवीत आहेत. ५ जून रोजी हायटेक विद्यालयासमोरील कडुलिंबाचे, तर २४ जून रोजी मोरे चौकातील लिंबाचे अशी दोन झाडे तोडली. काही महिन्यांपूर्वी येथील अग्निशमन केंद्रातील अशोकाची ८ ते १० झाडे अशाच प्रकारे तोडली होती.

Web Title: In the metropolis of Walaj, the aboriginal encroachment;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.