एमजीएम वृत्तपत्रविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:04 AM2021-07-11T04:04:56+5:302021-07-11T04:04:56+5:30
यावेळी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, एमजीएम संस्थेचे विश्वस्त प्रतापराव बोराडे व सामाजिक शास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके यांची ...
यावेळी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, एमजीएम संस्थेचे विश्वस्त प्रतापराव बोराडे व सामाजिक शास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सिद्धीने सिव्हिल इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यावा, असा आग्रह आमच्या संपूर्ण कुटुंबीयांचा होता. मात्र, तिला पत्रकारितेत करिअर करायचे होते. ‘पोरीनं नाव कमावलं’, अशी भावना तिचे वडील प्रभंजन महातोले यांनी व्यक्त केली.
सिद्धी प्रभंजन महातोले हिची ‘ब्युरो ऑफ एज्युकेशनल अँड कल्चरल अफेअर्स एक्सचेंज प्रोग्राम’ अंतर्गत अमेरिकेतील ग्लोबल अंडर ग्रॅज्युएट एक्सचेंज प्रोग्रामसाठी तिची निवड झाली आहे. ही संस्था व्यवसायिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रासाठी युवकांना देशविदेशात शिक्षण घेण्यासाठी तसेच या क्षेत्रात कार्य करण्यासाठी प्रवृत्त करत असते. या उपक्रमाअंतर्गत भारतातून केवळ सिद्धी महातोले हिचीच निवड झाली असून ती पुढील सहा महिन्यांसाठी अमेरिकेत राहून शिक्षण घेणार आहे.
यावेळी प्रतापराव बोराडे, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ व प्रा.जोशवा बोईट यांनी मनोगत व्यक्त केले. सिद्धी महातोले हिनेही आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉ. रेखा शेळके यांनी प्रास्ताविक केले. आशय येडगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व प्रा. कविता सोनी यांनी आभार मानले.