म्हसला बु. येथे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:05 AM2021-05-20T04:05:51+5:302021-05-20T04:05:51+5:30
गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर बोरगाव बाजार येथील पूर्णा नदीपात्रात असून त्या विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे गावात ...
गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर बोरगाव बाजार येथील पूर्णा नदीपात्रात असून त्या विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे गावात एक महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे महिलांना परिसरातील खासगी विहिरींतून पाणी शेंदून आणावे लागत आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांनी ग्रामपंचायतीविरोधात रोष व्यक्त केला. गावाची लोकसंख्या दोन हजार असून ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक नाही. यामुळे सर्व कामे रखडली आहेत. विहीर अधिग्रहण प्रस्ताव दाखल केला जाऊ शकत नाही. यामुळे पाण्याचा शोध घेणाऱ्या अनेक महिलांना रोजमजुरीवर जावे लागत असल्याने त्यांचे हाल होत आहेत.
प्रतिक्रिया
गटविकास अधिकाऱ्याला वारंवार पूर्वकल्पना देऊन सुद्धा दीड महिन्यापासून ग्रामसेवक गावात नाही. यामुळे विहीर अधिग्रहण प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठविता येत नाही. वरिष्ठ कार्यालयाच्या मनमानी कारभारामुळे म्हसला गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
- कमलबाई गोराडे, सरपंच, म्हसला बु.
प्रतिक्रिया
गेल्या महिन्यापासून नळाला पाणी येत नाही. दूरवरून पाणी डोक्यावर वाहून आणावे लागत असल्याने वेळ जातो. यामुळे शेतात मजुरी करण्यासाठी जाता येत नाही.
- शशिकलाबाई पोपळघट, ग्रामस्थ.
फोटो ओळ :
गावात पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे गावातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती.
190521\img_20210516_085512_648_1.jpg
गावात पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे गावातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती