मध्यान्ह भोजन घोटाळा राजस्थानात; ईडीचे छापे छत्रपती संभाजीनगरात

By सुमित डोळे | Published: September 27, 2023 11:31 AM2023-09-27T11:31:07+5:302023-09-27T11:32:10+5:30

सप्टेंबर २०२२ मध्ये आयटीच्या पडल्या होत्या धाडी; मंगळवारी व्यावसायिकाच्या घरी ईडीचा छापा, दोन तास चौकशी

Mid-day meal scam in Rajasthan; ED raids in Chhatrapati Sambhajinagar | मध्यान्ह भोजन घोटाळा राजस्थानात; ईडीचे छापे छत्रपती संभाजीनगरात

मध्यान्ह भोजन घोटाळा राजस्थानात; ईडीचे छापे छत्रपती संभाजीनगरात

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : राजकीय पक्षाची संबंधित शहरातील बडे व्यावसायिक, सरकारी कंत्राटदारांच्या घरी ईडीने मंगळवारी छापा टाकत दोन तास चौकशी केली. २०२२ च्या सप्टेंबर महिन्यात मध्यान्ह घोटाळ्याशी संबंधित याच व्यावसायिकावर आयकर विभागाने छापा टाकला होता. मंगळवारच्या छापेमारीत याच व्यावसायिकाची चौकशी झाल्याची चर्चा होती. ईडी (अंमलबजावणी संचालनालय) कडून मात्र रात्री उशिरापर्यंत याला कुठलाही अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. मात्र, राजकीय क्षेत्रात याची जोरदार चर्चा सुरू होती.

मंगळवारी सकाळी २ वाहनांतून ईडीचे अधिकारी, कर्मचारी शहरात दाखल झाले होते. मछली खडक व ज्योतीनगरमध्ये त्यांनी छापेमारी केली. यात प्रामुख्याने व्यावसायिकाच्या एजन्सीच्या कार्यालयावर पथक बराच वेळ तपासणी करत होते. त्यानंतर व्यावसायिकाच्या औषधी एजन्सीवरदेखील पथकाने जाऊन तपासणी केली. या औषधी एजन्सीद्वारे राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयाला औषधांचा पुरवठा होतो. त्याच एजन्सीच्या बड्या दुकानातही हे पथक गेल्याची चर्चा होती.

महिना सप्टेंबरच, घोटाळा जुना की नवा?
मंगळवारी पडलेल्या छाप्यात नाव समाेर येत असलेल्या व्यावसायिकावरच सप्टेंबर २०२२ मध्येच आयकर विभागाने छापा टाकत चौकशी केली होती. राजस्थानच्या मध्यान्ह भोजन घोटाळा प्रकरणात ती कारवाई करण्यात आली होती. राजस्थानच्या शाळांमध्ये मध्यान्ह भोजन पुरवण्याच्या योजनेला सदर व्यावसायिक धान्यपुरवठा करत होता, असेही त्यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे ही कारवाई जुन्या घोटाळ्यासंदर्भात आहे की काही नवीन प्रकरणासाठी, अशी चर्चा शहरात सुरू आहे.

Web Title: Mid-day meal scam in Rajasthan; ED raids in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.