एमआयडीसीचे पाणी रोखले

By Admin | Published: December 14, 2015 11:53 PM2015-12-14T23:53:04+5:302015-12-15T00:06:14+5:30

ढाकेफळ, वाळूज महानगर : गोदावरी काठावरील गावांचा वीजपुरवठा बंद केल्याच्या निषेधार्थ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सोमवारी ब्रह्मगव्हाण येथील

MIDC has stopped the water | एमआयडीसीचे पाणी रोखले

एमआयडीसीचे पाणी रोखले

googlenewsNext


ढाकेफळ, वाळूज महानगर : गोदावरी काठावरील गावांचा वीजपुरवठा बंद केल्याच्या निषेधार्थ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सोमवारी ब्रह्मगव्हाण येथील पंपहाऊसला टाळे ठोकून वाळूज औद्योगिक वसाहतीला होणारा पाणीपुरवठा रोखला. दिवसभर पाणी न आल्याने औद्योगिक उत्पादनात घट झाली, तर वाळूज परिसरातील ग्रामस्थांचे पाण्याअभावी हाल झाले.
ऊर्ध्व भागातील धरणांतून जायकवाडीत १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार सोडलेल्या पाण्यापैकी ६.६३ टीएमसी पाणी जायकवाडीत पोहोचले. जायकवाडीत सोडलेले पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात येणार असल्याने त्याचा उपसा टाळण्यासाठी गोदाकाठावरील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतवस्तीवरील वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. या गावांतील दिवाळीही यामुळे अंधारात गेली होती. वीजपुरवठा बंद असल्याने पिण्यासाठी पाणी मिळणेही कठीण जात होते. जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला होता. पाण्याअभावी मनुष्य व जनावरांची होणारी आबाळ थांबावी, यासाठी ब्रह्मगव्हाण येथील पंपहाऊसला टाळे ठोकण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला होता, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
संयमाचा बांध फुटला
अन्नदाता शेतकरी संघटनेचे जयाजीराव सूर्यवंशी, कृष्णा पा. डोणगावकर, रमेश जाधव, डॉ. बबन जाधव, काकासाहेब काळे, नारायण जगदाळे, बाबासाहेब घुले, श्रीमंत जगदाळे, किशोर शिरवत, दिलीप जगताप, बाबूराव केकते, सुरेश कदम, राजेश रंधे, संजय साबळे, कडूबाळ जगताप, लक्ष्मण गायकवाड, मनोहर
शेतकऱ्यांनी पंपहाऊसचा ताबा घेऊन पाणीपुरवठा बंद केल्याचे समजल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. बिडकीन व पैठण एमआयडीसी पोलिसांनी पंपहाऊसकडे धाव घेतली. पैठणचे नायब तहसीलदार नामदेव देशटवाड, ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला; परंतु शेतकऱ्यांनी दाद दिली नाही.
४खंडित वीजपुरवठा पूर्ववत सुरूकरण्याचे लेखी आश्वासन स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याशिवाय माघार घेतली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सायंकाळी सहापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय अथवा पाटबंधारे विभागाचा एकही वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी आला नाही. अखेर पोलिसांनी आंदोलकांना अटक केली.

Web Title: MIDC has stopped the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.