‘सुपर स्पेशालिटी’च्या परिसरातील व्हॉल्व्हचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:02 AM2021-01-02T04:02:02+5:302021-01-02T04:02:02+5:30
घाटी रुग्णालयात एजंटांची घुसखोरी औरंगाबाद : घाटी रुग्णालयात औषधींसह विविध वैद्यकीय साहित्य विकणाऱ्या एजंटांची घुसखोरी सुरूच आहे. रुग्णांचा, नातेवाइकांचा ...
घाटी रुग्णालयात
एजंटांची घुसखोरी
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात औषधींसह विविध वैद्यकीय साहित्य विकणाऱ्या एजंटांची घुसखोरी सुरूच आहे. रुग्णांचा, नातेवाइकांचा शोध घेऊन स्वस्तात औषधी, साहित्य आणून दिले जाईल, असे सांगितले जाते. यातून फसवणुकीचे प्रकारही होतात. याकडे घाटी प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
एसटी बसच्या तपासणीची प्रतीक्षाच
औरंगाबाद : सिडको बसस्थानकाच्या काही अंतरावर काही दिवसांपूर्वीच एसटी बस आणि दुचाकीस्वारांचा अपघात झाला होता. या अपघातग्रस्त बसची आरटीओ कार्यालयाकडून तपासणी अद्यापही झालेली नाही. या तपासणीनंतर अपघाताचे कारण स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.
साईनगरात विद्युत डीपी उघडी
औरंगाबाद : साईनगर परिसरातील विद्युत डीपी गेल्या काही दिवसांपासून उघडीच आहे. रस्त्याच्या कडेलाच ही विद्युत डीपी आहे; परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे. डीपीचा दरवाजा लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
पदमपुऱ्यात रस्त्यावरच कचरा
औरंगाबाद : पदमपुरा परिसरात ऐन रस्त्यावरच कचरा टाकला जात आहे. ‘कचरा टाकू नये, कारवाई केली जाईल’, असा फलकही याठिकाणी लावलेला आहे. तरीही कचरा टाकला जात आहे. कचरा टाकणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.