मिलिंद पाटीलने ६१ चेंडूंत ठोकल्या नाबाद १0२ धावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:57 AM2017-12-25T00:57:30+5:302017-12-25T00:58:00+5:30

औरंगाबादचा शैलीदार सिनिअर फलंदाज मिलिंद पाटील याने केलेल्या दणकेबाज शतकी खेळीच्या बळावर कम्बाईन बँकर्सने स्कोडा संघावर ९ गडी राखून मात केली. अन्य लढतीत एमआयटी रुग्णालयाने जॉन्सन अँड जॉन्सन संघावर १११ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

Milind Patil scored 102 not out off 61 balls | मिलिंद पाटीलने ६१ चेंडूंत ठोकल्या नाबाद १0२ धावा

मिलिंद पाटीलने ६१ चेंडूंत ठोकल्या नाबाद १0२ धावा

googlenewsNext
ठळक मुद्देऔद्योगिक क्रिकेट स्पर्धा : कम्बाईन बँकर्स, एमआयटी विजयी

औरंगाबाद : औरंगाबादचा शैलीदार सिनिअर फलंदाज मिलिंद पाटील याने केलेल्या दणकेबाज शतकी खेळीच्या बळावर कम्बाईन बँकर्सने स्कोडा संघावर ९ गडी राखून मात केली. अन्य लढतीत एमआयटी रुग्णालयाने जॉन्सन अँड जॉन्सन संघावर १११ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत रविवारी कम्बाईन बँकर्सविरुद्ध स्कोडा संघाने २0 षटकांत ८ बाद १५८ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून विपुल भोंडे याने ३२ चेंडूंतच ६ चौकारांसह ४२ धावा ठोकल्या. विजय मेहेत्रेने २ चौकार व एका षटकारासह ३३, अभिजित भगतने २३ धावा केल्या. कम्बाईन बँकर्सकडून निखिल मुरूमकर याने ३२ धावांत ४ गडी बाद केले. प्रत्युत्तरात औरंगाबादचा सिनिअर फलंदाज मिलिंद पाटील याने चौफेर टोलेबाजी करताना अवघ्या ६१ चेंडूंतच ५ टोलेजंग षटकार व ९ खणखणीत चौकारांसह ठोकलेल्या नाबाद १0२ धावांच्या खेळीच्या बळावर कम्बाईन बँकर्सने विजयी लक्ष्य १६.३ षटकांत फक्त १ गडी गमावून सहज गाठले. राजेश कीर्तिकरने २१ व गौरव गंगाखेडकरने नाबाद २0 धावा केल्या. स्कोडाकडून विजय मेहेत्रेने १ गडी बाद केला.
तत्पूर्वी, सकाळच्या लढतीत अमोल इंगळेने ४ चौकार व एका षटकारासह फटकावलेल्या ५२ धावांच्या बळावर एमआयटी रुग्णालयाने ८ बाद १७५ धावा फटकावल्या. आकाश लोखंडेने ३१, साईनाथ डहाळेने २७ व केदार काळेने २५ धावा केल्या. जॉन्सन अँड जॉन्सनकडून सचिन सबनीस व एकनाथ बांगर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात जॉन्सन अँड जॉन्सन संघ ९ बाद ६४ पर्यंतच मजल मारू शकला. त्यांच्याकडून अथर्व पुजारीने सर्वाधिक २१ धावा केल्या. एमआयटीकडून साईनाथ डहाळेने १७ धावांत ४ व एस. कोट्टेवार याने ३ गडी बाद केले.

Web Title: Milind Patil scored 102 not out off 61 balls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.