ट्रक चालकांना लुटणारी टोळी जेरबंद

By Admin | Published: July 11, 2017 04:01 PM2017-07-11T16:01:11+5:302017-07-11T16:01:11+5:30

राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांना लुटणा-या टोळीला बाळापूर पोलिसांनी १० जुलै रोजी रात्री १ वाजता जेरबंद केले.

Militant gang robbery | ट्रक चालकांना लुटणारी टोळी जेरबंद

ट्रक चालकांना लुटणारी टोळी जेरबंद

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
बाळापूर (अकोला), दि. 11 - राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांना लुटणा-या टोळीला बाळापूर पोलिसांनी १० जुलै रोजी रात्री १ वाजता जेरबंद केले. गेल्या दहा दिवसांपासून ही टोळी दुचाकीवर येउन ट्रक चालकांना लुटत होती. यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून एकास संशयावरून ताब्यात घेतले आहे. एक आरोपी पसार झाला आहे. 
 
राष्ट्रीय महामार्गावर रात्री प्रवास करणाºया ट्रक चालकांना अकोल्यातील काही जण दुचाकीने येउन लुटत होते. हा प्रकार गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू होता. पोलिसांची ससेमीरा नको म्हणून ट्रक चालकांनी या घटनेची तक्रार करत नव्हते. एका चालकाने सोमवारी ही बाब बाळापूर पोलिसांना सांगितली. पोलिसांनी या टोळीवर पाळत ठेवली. सोमवारी रात्री या टोळीने एक ट्रक चालकाकडून ६,५०० रुपये लुटले. त्यानंतर आणखी एका वाहनाला अडवण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. यावेळी एका दुचाकीवर दोघे व दुसºया दुचाकीवरून तिघे जण आले होते. यातील तीन आरोपींना पोलिसांना रंगेहाथ अटक केली तर एकाला संशयावरून ताब्यात घेतले. या घटनेतील अन्य एक आरोपी पसार झाला आहे. ही कारवाई ठाणेदार एफ.सी.मिर्झा यांच्या मार्गदर्शनात बाळापूर पोलिसांनी केली. 

Web Title: Militant gang robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.