जिल्हा दूध संघ उभारणार मिल्क पार्लर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:35 AM2017-09-25T00:35:52+5:302017-09-25T00:35:52+5:30
जिल्हा दूध संघाने शनिशिंगणापूर, भद्रा मारोती खुलताबाद व स्कोडा चौक, शेंद्रा एमआयडीसी येथे मिल्क पार्लरची उभारणी केली आहे. तसेच वेरूळ, पैठण व वैजापूर येथे मिल्क पार्लर उभारण्याचे प्रयत्न सुरूझाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हा दूध संघाने शनिशिंगणापूर, भद्रा मारोती खुलताबाद व स्कोडा चौक, शेंद्रा एमआयडीसी येथे मिल्क पार्लरची उभारणी केली आहे. तसेच वेरूळ, पैठण व वैजापूर येथे मिल्क पार्लर उभारण्याचे प्रयत्न सुरूझाले आहेत. दूध संघाची पिशवीबंद दूध विक्री सरासरी ४९ हजार ४७७ हजार लिटर्स प्रतिदिन आहे.
दूध संघाच्या गांधेली दुग्ध प्रकल्पाला आयएसओ २२००० प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. चालू वर्षापासून या दुग्ध शाळेमध्ये गुणवत्ता तपासणीसाठी प्रकल्प व संघाच्या सर्व शीतकरण केंद्रात इको मिल्क, मिल्को स्कॅन दूध तपासणी मशीन कार्यान्वित करण्यात आले आहे. या मशीनद्धारे दुधामधील फॅट, एसएनएफ, प्रोटिन व पाण्याचे प्रमाण यांची तपासणी केली जाते.
संघाच्या मालकीचे दुग्ध प्रकल्प गांधेलीव्यतिरिक्त शीतकरण केंद्र बनशेंद्रा, शीतकरण केंद्र पाथ्री, पैठण व बल्क कूलर युनिट वैजापूर, सिल्लोड व फर्दापूर येथे चालू आहेत. स्वच्छ दूध निर्मिती योजनेअंतर्गत २८ बल्क कूलरची संस्था पातळीवर उभारणी करण्यात आली आहे. प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून २ लाख दूध उत्पादकांशी व ग्राहकांशी थेट व्यावसायिक संबंध निर्माण झाले आहेत व प्रतिमहा सुमारे ४ कोटी ७० लाख रुपयांपर्यंतचा निधी ग्रामीण भागातील दूध उत्पादकांपर्यंत जात आहेत. जिल्हा दूध संघाने एकूण १८ नग कडबा कटर खरेदी केलेले आहेत व अनुदान तत्त्वावर त्याचे वाटप करण्यात आले आहे. जिल्हा दूध संघाला नॅशनल डेअरी प्लॅन योजनेअंतर्गत दुसºया टप्प्यातील १९.३० लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे, तसेच संतुलित पशुआहार कार्यक्रमांतर्गतही १२४ लाखांचा प्रकल्प मंजूर झाला आहे. म्हशीच्या दुधाच्या खरेदीसाठी सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे एक हजार लिटर क्षमतेचे तीन बल्क कूलर कार्यान्वित करण्यात आले आहेत. स्वच्छ दूध निर्मिती योजनेअंतर्गत प्रथम, द्वितीय व अंतिम टप्प्यातील एकूण निधी दूध संघाला प्राप्त झाला असून, त्यातून २८ बल्क मिल्क कूलर, ८ हजार ७०० नग पाच लिटर क्षमतेच्या स्टेनलेस स्टीलच्या कॅन्स व ७० नग इको मिल्क खरेदी करण्यात