मिल कॉर्नर ते सिटी क्लब रस्ता आजपासून बंद; उद्या १५ तासांसाठी सहा मार्गांवर वाहनांना बंदी
By सुमित डोळे | Published: April 13, 2024 07:40 PM2024-04-13T19:40:57+5:302024-04-13T19:41:39+5:30
क्रांती चौक ते मिलकॉर्नर दरम्यान ७२ मिरवणुकांचा सहभाग, ७७ ठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वत्र मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे. विविध ठिकाणी पारंपरिक ढोलताशांची तयारी सुरू आहे. सामाजिक उपक्रमांचेही नियोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच पोलिसांनी देखील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी १२०० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. शनिवारी सायंकाळी ६ वाजेपासूनच बंदोबस्त तैनात असेल. त्याशिवाय मिरवणुकीच्या मुख्य मार्गांवरील वाहतुकीत देखील मोठा बदल करण्यात आला आहे.
सायंकाळपासून भडकल गेट, सिटी क्लब रस्ता बंद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सायंकाळी ६ वाजेपासूनच नागरिक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. त्या धर्तीवर सायंकाळी ६ ते मध्यरात्री १२ पर्यंत भडकलगेट ते सिटी क्लब हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.
- रविवारी सकाळी १० ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हे मार्ग वाहतुकीसाठी बंद राहतील
-महावीर चौक (बाबा पेट्राेल पंप) ते अमरप्रीत चौक.
-गोपाल टी, क्रांती चौक, सिल्लेखाना, पैठण गेट, बाराभाई ताजिया, गुलमंडी, सुपारी हनुमान मंदिर, उत्तम मिठाई भांडार, सिटी चौक, जुना बाजार, मुख्य पोस्ट ऑफिस, भडकल गेट.
-शहागंज, गांधी पुतळा, सराफा, सिटी चौक.
-औरंगपुरा पोलिस चौकी ते बाराभाई ताजिया.
-मिल कॉर्नर ते सिटी क्लब
-एन-१२ नर्सरी, गोदावरी पब्लिक स्कूल, टी.व्ही. सेंटर, एन-९, अयोध्यानगर, शिवनेरी काॅलनी, एन-७ शॉपिंग सेंटर.
- दरवर्षीप्रमाणे मुख्य मिरवणूक क्रांती चौकातून सुरू होऊन भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विसर्जित होईल.
-क्रांती चौक ते मिलकॉर्नर दरम्यान एकूण ७२ मिरवणुकांचा सहभाग.
-हडको सिडको समिती उत्सवादरम्यान १६ मिरवणुकांचा सहभाग.
-सतरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकूण १२६ मिरवणुका.
-शहरात विविध ७७ ठिकाणी अभिवादन कार्यक्रम होतील.
एकूण ६० व्यासपीठांद्वारे नागरिकांचे स्वागत
एकूण ६० व्यासपीठांद्वारे नागरिकांचे स्वागत केले जातील. यामध्ये क्रांती चौकात ४२, सिटी चौक १३ तर सिडकोत ५ व्यासपीठांना शुक्रवारी सायंकाळपर्यंत परवानगी देण्यात आल्याचे विशेष शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले.