केळी लागवडीवरील कोट्यवधींचा खर्च मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:31 AM2017-10-30T00:31:42+5:302017-10-30T00:31:48+5:30

इसापूर धरणामध्ये फक्त १२ टक्के पाणीसाठा असल्याने यंदा केळी, ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत़ अर्धापूरमध्ये १५०० तर मुदखेड तालुक्यात ३००० अशी जवळपास साडेचार हजार हेक्टरवर केळीची लागवड झाली आहे़ इसापूर धरणात पाणी नसल्याने यंदा केळीला पाणी मिळणार नसल्याने हजारो हेक्टरवरील केळी कापून काढण्याचा सपाटाच शेतकºयांनी लावला आहे़ केळी लागवडीपासून आजपर्यंत प्रतिहेक्टरी ६० ते ७० हजार खर्च झाला आहे़ त्यामुळे लागवडीवरील कोट्यवधींचा खर्च मातीमोल होणार असून चारशे कोटी रूपयांची उलाढाल ठप्प होईल, असे चित्र आहे़

Millions of bills costing on banana plantations | केळी लागवडीवरील कोट्यवधींचा खर्च मातीमोल

केळी लागवडीवरील कोट्यवधींचा खर्च मातीमोल

googlenewsNext

श्रीनिवास भोसले।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : इसापूर धरणामध्ये फक्त १२ टक्के पाणीसाठा असल्याने यंदा केळी, ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत़ अर्धापूरमध्ये १५०० तर मुदखेड तालुक्यात ३००० अशी जवळपास साडेचार हजार हेक्टरवर केळीची लागवड झाली आहे़ इसापूर धरणात पाणी नसल्याने यंदा केळीला पाणी मिळणार नसल्याने हजारो हेक्टरवरील केळी कापून काढण्याचा सपाटाच शेतकºयांनी लावला आहे़ केळी लागवडीपासून आजपर्यंत प्रतिहेक्टरी ६० ते ७० हजार खर्च झाला आहे़ त्यामुळे लागवडीवरील कोट्यवधींचा खर्च मातीमोल होणार असून चारशे कोटी रूपयांची उलाढाल ठप्प होईल, असे चित्र आहे़
इसापूर धरण क्षेत्र परिसरात पाऊस न झाल्याने यंदा पहिल्यांदाच १२ टक्के जलसाठा झाला आहे़ सदर धरणावर अवलंबून असणाºया नांदेडसह हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकºयांवर संकट ओढावले आहे़ पाण्याअभावी केळी येऊ शकणार नाहीत, या भितीने शेकडो शेतकरी डोक्यापर्यंत वाढलेल्या केळी कापून काढत आहेत़
यंदा सर्वत्र चांगला पाऊस झाला असल्याचा गवगवा शासनदरबारी असलेल्या नोंदीवरून केला जात आहे़ परंतु, नांदेड जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, मुदखेड, भोकर, उमरी, धर्माबाद, हदगाव या तालुक्यांना वरदान ठरलेले इसापूर धरण यंदा कोरडेठाक आहे़ संपूर्ण पावसाळ्यात पहिल्यांदाच इसापूर धरण १२ टक्के एवढे कमी भरले आहे़ त्यामुळे या धरणावर अवलंबून असणारी हजारो हेक्टरमधील केळी, ऊस, हळद आदी पीकं धोक्यात सापडली़ अर्धापूरसह मुदखेड तालुक्यातील शेतकºयांनी यंदा इसापूर धरणातून पाणीपाळ्या मिळणार नाहीत, हे लक्षात घेवून जून, जुलैमध्ये लागवड केलेल्या शेकडो हेक्टरवरील केळी काढून टाकण्याचा सपाटा लावला आहे़ केळीचे हिरवेगार बन डोक्यापर्यंत ऊंच झालेल्या केळी कापतांना पोटच्या मुलांना मारल्यासारख्या वेदना होत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत़ त्यातच बँकाकडून पीकविमा स्विकारला जात नसल्याने शेतकºयांना दुहेरी संकट ओढावले आहे़
निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि शासनाच्या उदासिन धोरणामुळे अडचणीत सापडलेला बळीराजा पुन्हा एकदा संकटात अडकला आहे़ राज्यभरात अर्धापूर तालुक्यातील केळी प्रसिद्ध आहे़ येथून परराज्यातदेखील केळी पाठविली जाते़ जिल्ह्यात अर्धापूर, मुदखेड तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते़ दरवर्षी अर्धापूर तालुक्यातील अडीच ते तीन हजार हेक्टरवर केळी लागवड केली जाते़ पावसाचे प्रमाण कमी असल्याने यंदा बहुतांश शेतकºयांनी केळी लागवडीकडे पाठ फिरविली़ त्यातही हजारो शेतकºयांनी आठशे ते १२०० हेक्टरवर यंदा केळीची लागवड केली़
दरम्यान, इसापूर धरण क्षेत्रात कमी पाऊस झाला़ दरवर्षी येथून पाच ते सहा पाणीपाळ्या मिळतात़ मागील वर्षात चांगले उत्पादन झाल्याने यंदा केळी लागवड केलेल्या शेतकºयांनी लागवडीपासूनच खर्चावर जोर दिला होता़ यामध्ये टिश्यू कल्चरचे बेणे घेण्यापासून खताची मात्रा, ठिबक आदीवर हजारोंचा खर्च केला़ परिसरातील शेकडो शेतकरी केळी काढून टाकत असल्याने हा खर्च मातीत गेल्यात जमा आहे़

Web Title: Millions of bills costing on banana plantations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.