लाखो चिमुकले सकस आहाराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:48 AM2017-09-27T00:48:55+5:302017-09-27T00:48:55+5:30

मागील पंधरा दिवसांपासून अंगणवाडी कर्मचाºयांच्या राज्यव्यापी संपामुळे बालके सकस आहारापासून वंचित आहेत. हिंगोली जिल्ह्यात १०८९ अंगणवाड्यांतील लाखो बालकांचा आहार बंद आहे. तुटपुंजी मानधन वाढ मान्य नसल्याने संप सुरूच राहणार आहे. संपाचा मोठा फटका राज्यातील लाखो बालकांना बसत आहे.

Millions of chimukles without grilling | लाखो चिमुकले सकस आहाराविना

लाखो चिमुकले सकस आहाराविना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मागील पंधरा दिवसांपासून अंगणवाडी कर्मचाºयांच्या राज्यव्यापी संपामुळे बालके सकस आहारापासून वंचित आहेत. हिंगोली जिल्ह्यात १०८९ अंगणवाड्यांतील लाखो बालकांचा आहार बंद आहे. तुटपुंजी मानधन वाढ मान्य नसल्याने संप सुरूच राहणार आहे. संपाचा मोठा फटका राज्यातील लाखो बालकांना बसत आहे.
तुटपुंज्या मानधनात काम करणे अशक्य आहे. त्यात शासनाने केलेली मानधन वाढ कर्मचाºयांना मान्य नाही. त्यामुळे संप सुरूच राहणार आहे. बेमुदत संपात जवळपास दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनिस सहभागी झाल्या आहेत. जोपर्यंत मानधन वाढ होणार नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय कृती समितीने घेतला. हिंगोली जिल्ह्यातील १ हजार ८९ अंगणवाड्यातून जवळपास १ लाख १० हजार बालकांना सकस आहार दिला जातो. चिमुकल्यांचा पोषण आहार मागील पंधरा दिवसांपासून बंदच आहे. त्यामुळे तीव्र कुपोषित बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील बालके सकस आहाराविना कुपोषणाच्या विळख्यात सापडत चालली आहेत. काही ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न झाला. मात्र सर्वत्र त्यात यश आले नाही.
बाह्ययंत्रणेमार्फत नियोजन - जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत १६४ अंगणवाड्यांमध्ये बाह्य यंत्रणेमार्फत आहार पुरवठा केला जात आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण अधिकारी गणेश वाघ यांनी दिली. इतरत्र प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Millions of chimukles without grilling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.